Prashant Kishor on Nitish kumar bihar political crisis news in marathi bjp jdu alliance 
देश

Prashant Kishor: अवघ्या काही महिन्यातच ही आघाडीही फुटणार; नितीश कुमारांनी पलटी मारल्यानंतर प्रशांत किशोर यांचा दावा

Prashant Kishor: बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपबरोबर नव्याने स्थापन केलेल्या सरकारवर रणनीतीकार आणि नेते प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.

सकाळ वृत्तसेवा

Prashant Kishor on Nitish Kumar

पाटणा: ‘‘बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपबरोबर नव्याने स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य बिहारमधील २०२५च्या निवडणुकांच्या आतच स्पष्ट होईल, अवघ्या काही महिन्यातच ही आघाडीही फुटणार आहे’’ असे मत रणनीतीकार आणि नेते प्रशांत किशोर यांनी रविवारी व्यक्त केले.

‘‘साधारण १७ महिन्यांपूर्वी बिहारमध्ये नितीश यांनी भाजपशी फारकत घेतली होती. तेव्हा, आता नितीश यांच्यासाठी भाजपचे दार कायमचे बंद झाले असल्याचे प्रतिपादन भाजपने केले होते. मात्र आता त्याच नितीश यांच्याशी भाजपने परत एकदा आघाडी केली आहे. भाजपला याची मोठी किंमत चुकवावी लागेल’’ असा दावाही किशोर यांनी केला आहे.‘‘नितीश यांनी बदलले भूमिका ही माझ्यासाठी आश्‍चर्याची बाब मुळीच नाही कारण जेव्हा नितीश महाआघाडीत सहभागी झाले होते तेव्हाच मी सांगितले होते की ते या आघाडीमध्ये फारकाळ राहणार नाहीत,’’ असे प्रतिपादनही किशोर यांनी केले आहे. (Bihar Politics News in Marathi)

ही आघाडीही फुटेल-

नितीश यांनी भाजपबरोबर केलेल्या आघाडीवरून बोलताना किशोर म्हणाले, ‘‘बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जेव्हा त्यांच्या मतदारांकडे मते मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना त्यांच्या मतदारांना याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल की, भाजपने नितीश यांच्याशी युती का केली? मी आणखी एक भाकीत करतो की. हे सरकार देखील काही महिनेच टिकेल.’’
सत्ता बदलासाठी ‘जन सुराज्य यात्रा’ कारणीभूत ठरली असल्याचा दावाही किशोर यांनी यावेळी केला.

आजच्या घटनेने जर हे सिद्ध होत असेल की नितीश हे ‘पलटुराम’ आहेत, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे देखील त्याहून वेगळे नाहीत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप ही सर्व गणिते आखत आहे. (Latest Marathi News)

-प्रशांत किशोर, रणनीतीकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT