bihar esakal
देश

एकत्र चहा पिऊन विरोधक एकत्र येत नसतात; प्रशांत किशोरांचा नितीश कुमारांना टोला

सोबत चहा पिवून राजकारण बदलत नाही

सकाळ डिजिटल टीम

बिहार राजकारणात सक्रीय झाल्यानंतर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा मिडीया समोर जावून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते "म्हणाले नेत्यांच्या भेटी, आणि सोबत चहा पिवून राजकारण बदलत नाही."

नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याला अवाजवी महत्त्व : प्रशांत किशोर

प्रशांत किशोर यांनी बिहार मधील बदललेल्या राजकारणावर म्हणाले, नितीश यांनी भाजप सोडून महागठबंधनमध्ये गेल्याची घटना राज्यावर अवलंबून आहे. याचा राज्याच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही. ते "म्हणाले महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि आत्ता एनडीएचे सरकार आहे. परंतु याचा प्रभाव बिहारवर नाही झाला. ते म्हणाले नितीश यांच्या दौरांचा काहीही फरक राजकारणावर पडणार नाही, आणि त्या दौऱ्यांना काडी मात्र महत्त्व नाही.

बिहारमध्ये काहीही विकास झाला नाही, नितीशकुमार खुर्चीला चिकटून बसलेत: प्रशांत किशोर

प्रशांत किशोर म्हणाले नितीश कुमारांनी राज्यात काहीच विकास केला नाही. बिहीर आजही मागास राज्य आहे. नितीश सुरक्षे शिवाय बाहेर पडले तर त्यांना समजेल विकास. नितीश कुमार 10 वर्षांपासून राजकीय निती दाखवून खुर्चीला चिकटून बसले आहेत. खुर्चीला चिकटून काहीही होणार नाही. तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागेल. असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांची राहुल गांधी यांच्यावर टिका

ते म्हणाले राहुल गांधी यांनी त्या राज्यात यात्रा केली पाहिजे जिथे, काँग्रेसला विरोधी पक्ष भाजप असेल. आता नितीश कुमार यांना जनतेच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये विजय मिळवणे अवघड आहे. नितीश कुमारांविरोधात लोकांमध्ये रोष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT