देश

Video : प्रयागराजमध्ये हत्येचा थरार! खूनाच्या घटनेतील साक्षीदार अन् पोलिसावर बेछूट गोळीबार

सकाळ डिजिटल टीम

Prayagraj Umesh Pal Murder News : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील धूमनगंज भागात शुक्रवारी भीषण गोळीबाराची घटना गडली आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून परिसरात दहशत पसरली आहे.

हल्लेखोरांनी बीएसपीचे माजी आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पालची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमध्ये उमेशच्या सशस्त्र सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला आहे.

या गोळीबाराच्या घटनेचा आरोप बाहुबली अतीक अहमद याच्यावर ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनाक्रम कैद झाला आहे. त्यावरुन पोलिस पुढी तपास करीत आहेत.

या घनटेमध्ये आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. प्रयागराजच्या धूमनगंज भागात रस्त्यावर झालेल्या शूटआऊटमुळे दहशत पसरली आहे.

बाहुबली अतीक अहमदने ही हत्या केल्याचा आरोप पीडित परिवाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT