Indian constitution sakal
देश

Indian Constitution : आता शाळा-महाविद्यालयांत दररोज वाचावी लागणार संविधानाची प्रस्तावना; सरकारचा महत्वपूर्ण आदेश

संविधानाची मूलभूत उद्दिष्टे आणि सर्व जाती आणि धर्मांना समान वागणूक मिळण्यास सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे.

सकाळ डिजिटल टीम

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे चित्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बंगळूर : सरकारी, अनुदानित आणि खासगी यासह सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी दररोज संविधानाची प्रस्तावना वाचली पाहिजे. सर्व सरकारी कार्यालये आणि विभागांना गुरुवारी संविधानाच्या (Indian Constitution) प्रस्तावनेचा फोटो लावण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या अध्यक्षतेखाली काल विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे चित्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामामागील विचार, संविधानाची माहिती नागरिकांना समजली पाहिजे.

विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील तरुणांनी त्याचे वाचन केले पाहिजे. सरकारी असो, अनुदानित किंवा खासगी शाळा असो तेथील विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना अनिवार्यपणे वाचली पाहिजे, असे समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवाप्पा यांनी कॅबिनेट बैठकीनंतर म्हणाले. महादेवप्पा म्हणाले, ‘‘संविधानाची मूलभूत उद्दिष्टे आणि सर्व जाती आणि धर्मांना समान वागणूक मिळण्यास सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT