PM Narendra Modi Team eSakal
देश

Corona: दिवसाला पाच लाख रुग्ण हाताळण्याची क्षमता; सरकारचा छातीठोक दावा

विनायक होगाडे

सरकारने गुरुवारी असा दावा केलाय की, दिवसाला पाच लाख कोरोना रुग्ण हाताळण्याची क्षमता आरोग्य विभाग हाताळू शकतो, इतपत क्षमता तयार झाली आहे.

नवी दिल्ली : सरकारने गुरुवारी असा दावा केलाय की, दिवसाला पाच लाख कोरोना रुग्ण हाताळण्याची क्षमता आरोग्य विभाग हाताळू शकतो, इतपत क्षमता तयार झाली आहे. पाच रुग्ण हाताळू शकण्याचा दावा आम्ही करतोय याचा अर्थ भविष्यात इतक्या मोठ्या संख्येने दैनंदिन रुग्णसंख्या आढळणार आहे, असं नाही.

कोरोना संक्रमणामध्ये पुन्हा वाढ होऊ लागली तर काय तयारी आहे, याबाबतची माहिती देताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की, राज्यांकडून मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, कोरोना रुग्णांसाठी देशात सध्या 8.36 लाख बेड्स उपलब्ध आहेत. याशिवाय कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठीची जवळपास 10 लाख (9,69,885) बेड्स उपलब्ध आहेत.

पॉल यांनी म्हटलंय की, याशिवाय अतिरिक्त 4.86 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 1.35 लाख आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. सध्या कोरोना संक्रमितांची संख्या कमी आहे मात्र, आपली तयारी कमी नाहीये. दैनंदिन प्रकरणे हाताळण्यासाठी सध्या आपली तयारी मजबूत आहे. राज्य सरकार आणि खासगी क्षेत्रांसहित केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हे शक्य होतंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आतापर्यंत 1,200 पीएसए ऑक्सिजन संयंत्र काम करत आहे आणि देशात सध्या असा एकही जिल्हा नाहीये जिथे याप्रकारचं संयंत्र उपलब्ध नसेल. ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी देशात जवळपास 4,000 पीएसए ऑक्सिजन संयंत्र स्थापन केले जाणार आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलंय की, कोरोना रुग्णांच्या संभाव्य वृद्धीला हाताळण्यासाठीच्या तयारीमध्ये आपण जराही कसर सोडत नाहीयोत.

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेबंर या महिन्यांच्या दरम्यान लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. या काळात असणाऱ्या सण-समारंभाच्या काळात रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसेच हे सण डिजीटली साजरे करावेत, असा सल्ला देखील सरकारने दिला होता. सरकारने पुन्हा एकदा ही बाब स्पष्ट केलीय की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT