Marriage Google
देश

मुलीला लग्नात पालकांनी दिलेल्या भेटवस्तू म्हणजे हुंडा नव्हे - HC

सकाळ डिजिटल टीम

मुलीला तिच्या पालकांनी लग्नावेळी दिलेली भेट ही हुंडा म्हणता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.

मुलीला लग्नात अनेक भेटवस्तू देण्याची परंपरा देशात आहे. मात्र यातूनच हुंडाबळीसारखे प्रकार घडायला लागल्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. याबाबत आता केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय़ दिला आहे. मुलीला तिच्या पालकांनी लग्नावेळी दिलेली भेट ही हुंडा म्हणता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. एक सदस्यीय पीठाने सुनावणीवेळी हा निकाल दिला. थोडियूरमधील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दाखल याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. मुलीला लग्नावेळी दिलेले दागिने मुलीच्या पालकांना परत द्यावेत असा आदेश अधिकाऱ्यांनी दिला होता.

मुलीच्या पालकांनी त्यांच्या कुवतीनुसार मुलीला सोन्याचे दागिने भेट दिले होते ते हुंडा म्हणता येत नाही. मुलीला मिळालेल्या भेटवस्तू या स्वखुशीने देण्यात आल्या होत्या. मुलाच्या कुटुंबियांकडून याची मागणी कऱण्यात आली नव्हती. याचिकाकर्त्याने म्हटलं होतं की, अधिकाऱ्याला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही तसंच ते असा आदेश देऊ शकत नाहीत. न्यायाधीश एमआर अनिता यांनी अधिकाऱ्याचा आदेश स्पष्ट नसल्याचं म्हणत सोन्याचे दागिने हुंडा म्हणून घेतल्याची खात्री केली होती की नाही याबाबत कल्पना नसल्याचं सांगितलं.

न्यायालयाने म्हटलं की, लग्नावेळी कोणत्याही मागणीशिवाय मुलीला देण्यात आल्या असतील. जर त्या भेटवस्तू हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या यादीत असले तरी हुंडा घेण्यावर किंवा देण्यावर बंदी घालणाऱ्या कलम ३(१) अंतर्गत येणार नाहीत. याचिकाकर्त्याने म्हटलं की, तिचे लॉकरमध्ये ठेवलेले दागिने मी परते करेन. तसंच नेकलेस तिच्या कुटुंबियांना लग्नावेळीच परत दिला होता. लॉकरची किल्लीसुद्धा तिच्याकडेच असल्याचं याचिकाकर्त्याने सांगितलं होतं. या याचिकेनंतर महिलेनं तडजोड स्वीकारल्यानं हे प्रकरण निकाली निघालं. महिलेला लग्नात ५५ सोन्याचे दागिने मिळाले होते ते परत मिळावेत अशी मागणी केली होती. तसंच हे दागिने एका सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याचंही तिने सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT