latest political News 
देश

राष्ट्रपती निवडणूक - मोर्चेबांधणीला वेग, भाजपने 2 नेत्यांवर सोपवली जबाबदारी

२१ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार असून यासाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

२१ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार असून यासाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान १८ जुलैला होणार आहे. राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. यासाठी केंद्रातील भाजप सरकार आणि देशातील इतर विरोधी पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. २१ जुलै रोजी राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार असून यासाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे.

राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपकडून जगतप्रसाद नड्डा आणि राजनाथ सिंह हे नेते यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांवर भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो कोणी उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होईल, असे चित्र आहे.

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले आहे. कोविंद यांना राष्ट्रपतीपदी विजयी करून भाजपने देशभरातील दलित समुदायाला संदेश दिला होता. सध्या 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू असताना भाजप आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ शकतो, अशी चर्चा आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच भाजप त्या उमेदवाराची घोषणा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT