नवी दिल्ली: आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2021)आहे. भारताने युद्धात पाकिस्तानवर (indi-pakistan war) मिळवलेल्या विजयाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) कारगिल युद्धातील शहीदांना आदरांजली वाहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कारगिलमधल्या द्रास (dras) येथे जाऊन शहीदांना आदरांजली वाहणार होते. पण खराब हवामानामुळे राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. (President Ram Nath Kovind wont be laying a wreath at Kargil War Memorial in Dras dmp82)
राष्ट्रपती आता बारामुला युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण करतील. भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रासमधील खराब हवामानामुळे राष्ट्रपती कारगिलमधील युद्ध स्मारकावर जाणार नाहीत. आदरांजली वाहण्याच्या या कार्यक्रमाच्यावेळी राष्ट्रपतींसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावतही उपस्थित असणार आहेत.
दरवर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली कारगिलमध्ये ६० पेक्षा जास्त दिवस हे युद्ध लढले गेले. डोंगराळ भागात (mountain war) लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय सैन्याने (indian army) आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला व पाकिस्तानला पळवून लावत आपला भूभाग परत मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.