president ramnath kovind ram mandir  
देश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी दिला निधी; चेक केला सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील आयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या बांधकामासाठी निधी गोळा करण्याची मोहिम शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मोहिमेत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 5 लाख रुपयांचा निधी दान केला.

राम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  5 लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला. दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही एक लाख रुपये दिले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राम मंदिर ट्रस्टने सांगितलं होतं की, राम मंदिरासाठी निधी गोळा करत असताना जनतेच्या इच्छेनुसार मंदिराच्या बांधकामासाठी दान घेतलं जाईल. विश्व हिंदू परिषदेची अशी इच्छा आहे की, ही मोहिम देशातील 50 कोटी लोकांपर्यंत पोहचवण्याची आहे. या मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या पैशांना देवाचे पैसे म्हटले जाती आणि ते मागितले जाणार नाही. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये पैसे जमा होतील. 

स्वत:च्या इच्छेनं दान करणाऱ्यांसाठी कूपन छापण्यात येतील. ही कूपन्स 10 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असतील. 100 रुपयांचे 8 कोटी कूपन्स तर 10 रुपयांचे 4 कोटी कूपन्स छापले जातील. याशिवाय 1000 रुपयांची 12 लाख कूपन्स छापण्यात येतील. दान करण्यात आलेल्या रकमेनुसार पावती देण्यात येईल. सर्व कूपन वाटण्यासाठी 960 कोटी रुपये जमा होऊ शकतील. 

मंदिरासाठी पैसे गोळा करताना पूर्णपणे पारदर्शक व्यवहार केले जातील असं सांगण्यात आलं आहे. ज्या बँकांमध्ये पैसे जमा होतील ते फक्त कलेक्शन अकाउंटचं काम करतील. जवळपास 46 हजार शाखांच्या माध्यमातून देशभरात पैसे जमा होतील. तीन लोकांची एक टीम पैसे गोळा केल्यानंतर ते जवळच्या शाखेत 48 तासांच्या आत बँकेत जमा करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT