ramnath kovind 
देश

राष्ट्रपतींवरील बायपास सर्जरी यशस्वी; 27 मार्चला केलं होतं AIIMS मध्ये दाखल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज मंगळवारी दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी यशस्वी झाली असून सध्या राष्ट्रपतींची तब्येत स्थिर आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, मंगळवारी दिल्लीच्या एम्समध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर एक यशस्वी बायपास सर्जरी केली गेली आहे. मी या यशस्वी ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या टीमचं अभिनंदन करतो. राष्ट्रपतींच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी AIIMSच्या प्रमुखांशी चर्चा केली. 

गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखत होतं. त्यामुळे त्यांना दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथे त्यांचं रुटीन चेकअप करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावरील पुढील उपचारांसाठी एम्समध्ये पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राष्ट्रपतींना 27 मार्च रोजी दुपारी एम्समध्ये  हलवण्यात आलं. 

हेही वाचा - HDFC बँकेच्या नेट बँकिंगमध्ये घोळ; ग्राहकांच्या तक्रारीनंतर बँकेचं स्पष्टीकरण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 3 मार्चला कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. लष्करी रुग्णालयातच त्यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांनीसुद्धा लस टोचून घ्यावी असं आवाहन केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वय सध्या 75 वर्षे आहे. 2017 मध्ये ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. त्याआधी बिहारचे राज्यपाल म्हणून 2015 ते 2017 या कालावधीत काम पाहिलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT