Presidential Election 2022 Droupadi Murmu Vs Yashwant Sinha
Presidential Election 2022 Droupadi Murmu Vs Yashwant Sinha Sakal Digital
देश

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, सर्वच प्रमुख विरोधी पक्षात फूट

सकाळ डिजिटल टीम

Presidential Election 2002 : संसद आणि देशातील सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत एकीकडे एनडीएने आपली ताकद दाखवली आहे, तर दुसरीकडे विरोधी गटाला मात्र क्रॉस व्होटिंगला सामोरे जावे लागले आहे. गुजरातपासून ते यूपीपर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सपामध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले.

गुजरात कंधलमधील राष्ट्रवादीचे आमदार एस. जडेजा यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जात NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. ते पक्षातून वेगळी भूमिका घेतील, अशी भीती त्यांच्याबद्दल आधीच व्यक्त करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय झारखंडमधील राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंह यांनीही द्रौपदी मुर्मूच्या बाजूने मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केल्याचे ते म्हणाले.

एवढेच नाही तर गुजरातमधील भारतीय आदिवासी पक्षाचे नेते छोटूभाई वसावा यांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. गरिबांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेत्याला मी मतदान केल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही फूट पडली. एकीकडे अखिलेश यादव यांचे काका आणि प्रसपा प्रमुख शिवपाल यादव यांनी द्रौपदी मुर्मू यांना खुलेआम मतदान केले आहे, तर सपाचेच आमदार शाहजील इस्लाम यांनीही द्रौपदी मुर्मूयांच्या बाजूने मतदान केले. बरेलीतील भोजीपुरा येथील पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते.

एकेकाळी मुलायमसिंह यादव यांना आयएसआय एजंट म्हणणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करणार नसल्याचे शिवपाल यादव यांनी आधीच स्पष्ट केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग रोखण्यातही काँग्रेसला अपयश आले आहे .पक्षाचे ओडिशातील आमदार मोहम्मद मुकीम यांनीही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केले आहे. ओडिशा काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, मुकीम स्वतः प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा दावा करत होते. मात्र तसे न केल्याने ते पक्षावर नाराज होते.

हरियाणातही काँग्रेसला क्रॉस व्होटिंगला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान केले आहे. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसऐवजी भाजप समर्थित उमेदवाराला मतदान केले होते.

नियमानुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी व्हिप जारी करता येत नाही. सर्व आमदार आणि खासदारांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. पारंपारिकपणे नेते त्यांच्या पक्षाच्या भूमिकेच्या आधारावर मतदान करतात.अशा परिस्थितीत क्रॉस व्होटिंग हा कोणत्याही पक्षासाठी धक्का मानला जातो. राष्ट्रपती निवडणुकीतील सर्वात मोठा घटक यूपी आहे.राज्यात 403 आमदार आहेत आणि येथील आमदारांच्या मतांचे मूल्य 208 आहे, जे देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT