Presidential election BJP faces challenge of votes PM Modi delhi
Presidential election BJP faces challenge of votes PM Modi delhi Presidential election BJP faces challenge of votes PM Modi delhi
देश

राष्ट्रपती निवडणूक : भाजपसमोर आव्हान २.२ टक्के मतांचे - पंतप्रधान मोदी

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतिपदी स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यासाठी याखेपेस भाजप आघाडीकडे पुरेशी मते नाहीत व त्यात शिवसेना, अकाली दल यांच्यासारख्या पक्षांनी साथ सोडल्याने हा तिढा आणखी बिकट झाला आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भाजप राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी इलेक्ट्रोरल कॉलेजमधील आवश्यक २.२ टक्के मतांची बेगमी कशी करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘धक्कातंत्रा’चा विचार करता भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व या सर्वोच्च पदासाठी सध्या दिल्लीत चर्चेत असलेल्यांपैकी एखाद्या नावास पसंती देणार की असे नाव समोर आणणार ज्यांचा विरोध करणेच विरोधकांना कठीण व्हावे, याबाबत सध्या दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यासारख्या आदिवासी महिला नेत्या की मुख्तार अब्बास नक्वी, केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांच्यासारखे अल्पसंख्याक नेते राष्ट्रपतिपदी विराजमान होणार? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

टीम मोदीमधील एकमेव मुस्लिम चेहरा असलेल्या नक्वींचा संसदीय कारकिर्दीचा संधीकाळ आल्यासारखे चित्र आहे. त्यांच्यानंतर भाजपचे संसदेतील मुस्लिम खासदारांची संख्या शून्य होईल. प्रेषितांच्या अवमान प्रकरणानंतर अनेक आखाती देशांचा रोष अजून कमी झालेला नाही. त्यामुळे मतांचे गणित भाजप कसे जमविणार? हा औत्सुक्याचा विषय आहे.

राष्ट्रपतिपदासाठीच्या मतदानाच्या तारखांची आज घोषणा झाली. यावेळच्या निवडणुकीत सध्याच्या राजकीय बलाबलाचे गणित पाहिल्यास चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण २०१७ च्या तुलनेत यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना २०१७ मध्ये तब्बल ६५ टक्के मते मिळाली होती. त्या वेळी भाजप व मित्रपक्षांची सत्ता तब्बल ५ राज्यांत होती. महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड यापैकी एकाही राज्यात भाजपकडे सध्या सत्ता नाही. मध्यप्रदेश व कर्नाटकात भाजपने पराभवानंतर सत्ता हिसकावून घेतली. तरीही सध्याच्या स्थितीत भाजपकडे असलेल्या मतांची टक्केवारी ४८.९ टक्के होते तर विरोधकांकडे ५१.१ टक्के मते आहेत.

यांच्याकडून रसद शक्य

राज्यसभेतील पूर्वानुभव पाहता भाजपला सध्या बिजू जनता दल (ओडिशा), वायएसआर कॉंग्रेस ( आंध्र प्रदेश), बसप (उत्तर प्रदेश) या पक्षांचा सरळसरळ पाठिंबा मिळू शकतो. मोदींच्या विरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी देशभ्रमण करणारे तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या ‘टीआरएस’कडेही भाजप मदत मागू शकतो. मतदान गुप्त असल्याने शिवसेना, अकाली दल व अगदी समाजवादी पक्षाकडूनही भाजपला ‘आशा‘ बाळगता येऊ शकतात असे जाणकारंचे म्हणणे आहे. त्यामुळेच उईके, मुर्मू आदींसह नक्वींच्या नावाची चर्चा जोरात आहे...पण मोदींकडून उमेदवाराची घोषणा होईपर्यंत ती फक्त ‘चर्चाच'' राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT