Presidential Election Voting ends July 18 The result on July 21
Presidential Election Voting ends July 18 The result on July 21 Presidential Election Voting ends July 18 The result on July 21
देश

Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. ९) भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येतील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. १५ जून रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. (Presidential Election Voting ends July 18 The result on July 21)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीचे या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरविते.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्याने आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षातर्फे कोण उमेदवार असणार याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी नजीकच्या काळात घेतील. यंदा भाजपतर्फे महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अशी चर्चा आहे. केंद्र व अनेक राज्यांत सत्ता असलेल्या भाजपकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील इलेक्ट्रोरल कॉलेजमधील सर्वाधिक मते असली तरी निवडून येण्यासाठीचे आवश्यक संख्याबळ भाजपकडे नाही.

अशी होते राष्ट्रपतींची निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या (MP) मतांच्या किमतीचे वेगळे गणित असते. यामध्ये सर्व राज्यांच्या (विधानसभा) आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळणे हे विजय निश्चित करत नाहीत. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वजन (Weightage) प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य १०,९८,८८२ आहे. उमेदवाराला विजयासाठी ५,४९,४४४ मते मिळणे आवश्यक आहे. २०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास ५० टक्के मते एनडीएच्या बाजूने होती. म्हणजेच एकूण ४,८८० मतदारांपैकी ४,१०९ आमदार आणि ७७१ खासदारांनी मतदान केले होते.

राष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम व अन्य महत्त्वाचे मुद्दे

  • उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख - २९ जून २०२२

  • अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २ जुलै

  • मतदानाची तारीख १८ जुलै २०२२

  • मतगणना व निकाल जाहीर होणार - २१ जुलै २०२२

  • देशात लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण ७७६ खासदार आहेत.

  • प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे.

  • देशात एकूण ४१२० आमदार आहेत.

  • प्रत्येक राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य वेगळे असते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचे मूल्य सर्वाधिक २०८ आहे.

  • कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रपती होण्यासाठी ५ लाख ४९ हजार ४४१ मते आवश्यक आहेत.

  • पूर्णतः गुप्त मतदान होते. आपले मत दाखविणे म्हणजे ते बाद करणे

  • होय.

  • राज्यघटनेच्या कलम ३२४ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीची तरतूद

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपणार

  • वर्तमान राष्ट्रपतींची मुदत संपण्याआधी ६० दिवस नवीन राष्ट्रपतींच्या निवडीची अधिसूचना जारी होते.

  • राज्यसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी असतात व दिल्लीत त्यांच्याच देखरेखीखाली मतगणना होऊन निकाल जाहीर होतो.

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्यांचा सहभाग नसतो, यात निवडून आलेले लोकप्रतिनिधीच भाग घेऊ शकतात.

  • निवडणूक आयोगाने पुरविलेल्या पेननेच मतदान करता येणार. स्वतःचा पेन वापरल्यास ते मत बाद ठरविले जाईल.

  • नियम ७४ नुसार संसद भवन व राज्यांच्या विधानसभांत मतदान प्रक्रिया पार पडणार.

  • उमेदवारी अर्ज संबंधित उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच उपलब्ध होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT