Yati Satyadevanand Sarswati_Dharm Sansad 
देश

भारताला इस्लामिक स्टेट होण्यापासून वाचवा - यती सत्यदेवानंद

"मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय म्हणजे हिंदुंचं कमी होतंय"

सकाळ डिजिटल टीम

उना (हिमाचल प्रदेश) : भारतातील मु्स्लिमांचं प्रमाण वाढतंय म्हणजेच हिंदूंचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळं हिंदुंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे, असं वादग्रस्त विधान यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातील उना इथं रविवारी झालेल्या धर्म संसदेच्या पहिल्याच दिवशीच्या भाषणात त्यांनी हे विधान केलं. अखिल भारतीय संत परिषदेचे ते हिमाचल प्रदेशचे प्रभारी आहेत. (Prevent India from becoming Islamic State says Yeti Satyadevanand Saraswati)

यती सत्यदेवानंद सरस्वती हे यती नरसिंहानंद यांच्या संघटनेचे सदस्य आहेत. उनामधील मुबारकपूर इथल्या या धर्म संसदेत ते म्हणाले, "देशातील मुस्लिमांचं वाढतं प्रमाण हे दर्शवतंय की हिंदुंचं प्रमाण कमी होतंय. त्यामुळं हिंदुंनी त्यांचं कुटुंब अधिक सक्षम केलं पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मानवतेसाठी आणि सनातन धर्मासाठी त्यांनी अधिक मुलांना जन्म दिला पाहिजे"

भारताला इस्लामिक देश होण्यापासून वाचवा - यती सत्यदेवानंद

"भारत एक लोकशाही देश असून इथं हिंदू बहुसंख्य आहेत. पण मुस्लिम समाजाचे लोक प्लॅनिंगसह अनेक मुलांना जन्म देऊन आपली लोकसंख्या वाढवत आहेत. त्यामुळं भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यापासून वाचवण्यासाठी हिंदुंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असं आमच्या संघटनेचं आवाहन आहे. जेव्हा देशात मुस्लिम लोक बहुसंख्य होतील तेव्हा भारत शेजारी देश पाकिस्तानप्रमाणं इस्लामिक देश बनेल"

पोलिसांची नोटीस

यती सरस्वती यांच्या या विधानावरुन हिमाचल पोलिसांनी त्यांना नोटीस दिली असून कोणत्याही धर्माविरोधात भडकाऊ भाषण करु नये असा इशारा दिला आहे. जर नोटिशीतील निर्देशांचं पालन केलं गेलं नाही तर त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करावी लागेल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी १७-१९ डिसेंबर रोजी हरिद्वार इथं झालेल्या धर्म संसदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी यती नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT