shashi tharoor
shashi tharoor 
देश

रामदेव बाबांच्या योगाने पेट्रोल दिसेल 6 रुपये लिटर; शशी थरुरांची सरकारवर खोचक टीका

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात गेल्या 9 दिवसांपासून सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. यावरुन देशातील जनसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जवळपास शंभरी गाठलेल्या या किंमतींमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात यावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी काल संध्याकाळी योग गुरु रामदेव बाबा यांच्यावरील एका कार्टूनच्या आधारे केंद्र सरकारवर कठोर टीका केली आहे. 

या कार्टूनमध्ये रामदेव बाबा एका पेट्रोल पंपासमोर शीर्षासन करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या समोर पेट्रोलच्या किंमतीचा बोर्ड दिसत आहे. त्यावर 90 रुपये लिटर असं लिहण्यात आलं आहे. या कार्टूनच्या खाली मल्याळम भाषेत एक कॅप्शन देखील आहे ज्याचा अनुवाद करत थरुर यांनी आपलं ट्विट पोस्ट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जर तुम्ही बाबा रामदेव यांच्याकडून योग शिकून घेतला तर आपल्याला देखील पेट्रोलच्या किंमती 06 रुपये लिटर दिसून येतील. 

सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या वाढींना वेगळं महत्त्व आहे कारण या वाढीसह प्रत्येकवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवा उच्चांक गाठत आहेत. आज देखील डिझेलच्या किंमतीमध्ये 24 ते 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये देखील प्रीमियम पेट्रोल 14 फेब्रुवारी रोजी 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. 

प्रमुख शहरांमध्ये काय आहे किंमत?  

शहर             डिझेल    पेट्रोल
दिल्ली            79.95    89.54
कोलकाता       83.54    90.78
मुंबई              86.98    96.00
चेन्नई              85.01    91.68

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT