Chennai Police Arrested priest google
देश

पुजाऱ्याच्या वेशात गांजा विकणाऱ्याला अटक, मंदिर परिसरातच धंदा

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : मंदिराच्या परिसरातच गांजाचा धंदा (Ganja Selling) चालत असल्याची माहिती समोर आली आहे. पुजाऱ्याच्या वेशात गांजा विकत असलेल्या एकाला चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) अटक केली असून मंदिराच्या परिसरात गांजाच्या पुड्या बनवून विकण्याचे काम सुरू होते.

रोयापेट्टाह येथे एक व्यक्ती पुजाऱ्याच्या वेशामध्ये गांजा विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गांजा खरेदी करण्याच्या बहाण्याने पोलिसांनी या व्यक्तीला गाठले. त्यानंतर दामूने वृत्तपत्राच्या पॉकेटमध्ये भरलेला गांजा अधिकाऱ्यांना पुरवला. तेव्हा त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी सात किलो गांजा जप्त केला आहे. तसेच दामूकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. एम. राजा आणि ए असाईथाम्नी असे इतर दोघांची नावे आहेत.

आरोपी दामू हा वेळोवेळी त्याची जागा बदलून पोलिसांनी चकवा देत होता. तसेच त्याचे दोन साथीदार हे ड्रग्स तस्कर असून ते आंध्र प्रदेशातून ड्रग्सची तस्करी करत होते. राज्य पोलीस विभागाने गेल्या दोन आठवड्यांपासून नशामुक्तीच्या विरोधात मोठ्या मोहिमेत सहभाग घेतला असून 1400 किलो गांजा जप्त केला आहे. त्यांनी गुटखा आणि गांजा विक्री करणाऱ्या 5000 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हेल्मेट सक्ती! पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदेश; नियम मोडल्यास सेवापुस्तकात होणार नोंद, रस्ते अपघातात एका वर्षात १५००० मृत्यू, वाचा...

Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदारांनी अडवलेला टँकर गावात!; ग्रामस्थ आनंदीत; तहानलेल्या चिंचवनवासीयांची वणवण आता थांबणार

Panchang 13 April 2026 : सोमवार पंचांग! आजचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या वरुथिनी एकादशी, मुहूर्त

Best Low-Calorie Breakfast: डायट फॉलो करताय? मग नाश्त्यात हा लो-कॅलरी आणि हाय-न्यूट्रिशन स्मूदी बाउल नक्की ट्राय करा

आजचे राशिभविष्य - १३ एप्रिल २०२६

SCROLL FOR NEXT