modi meeting 
देश

सापडले 93 हजारांहून अधिक रुग्ण; मोदी सरकारची वाढली चिंता, उच्चस्तरिय बैठक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या प्रादुर्भावाची गती इतकी तीव्र आहे की, आता वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा लोकांची आणि प्रशासनाचीही झोप उडाली आहे. कोरोनाच्या या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरिय बैठक आयोजित केली. या बैठकीत कोविड-19 शी संबंधित मुद्यांवर आणि लसीकरणाच्या अभियानावर चर्चा झाली. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल समाविष्ट होते. असं म्हटलं जातंहोतं की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी पंतप्रधान मोदी या उच्चस्तरीय बैठकीनंतर काही मोठी घोषणा करु शकतात. 

आज देशभरात जवळपास 93 हजारहून अधिक रुग्ण सापडल्याने ही  बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जर कोरोना प्रादुर्भावाची गती हीच राहिली तर एक-दोन दिवसांतच हा आकडा एक लाखांहून अधिक संख्या पार करु शकतो. 

गेल्या 24 तासांत 93 हजारांगून अधिक रुग्ण
गेल्या 24 तासांत रेकॉर्डतोड अशा 93 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनाच्या संक्रमणामुळे तब्बल 500 हून अधिक रुग्णांचा जीव गेला आहे. एका दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण मिळण्याची परिस्थिती सप्टेंबर महिन्यात होती. गेल्या वर्षी 19 सप्टेंबर रोजी 92,574 नवे रुग्ण सापडले होते. 

सात लाखाच्या जवळ नवे ऍक्टीव्ह रुग्ण
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या 24 तासांत 60,048 कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी पोहोचले आहेत. यासोबतच देशात आतापर्यंत 1,16,29,289 रुग्ण  बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती 6,91,597 वर पोहोचली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका गणपतीपुळे देवस्थानाला; लाडू प्रसाद बंद

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT