Prime Minister Modi  sakal
देश

Narendra modi : मोदींच्या जॅकेटची संसद परिसरात चर्चा ! प्लॅस्टिक पासून निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना ते भेट दिले होते.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन ठरावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत पोहोचले. यादरम्यान ते राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणावेळी काही काळ आले होते. मोदींनी आज परिधान केलेले आकाशी रंगाचे जॅकेट चर्चेचा विषय ठरले. टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून (पीईटी) हे जॅकेट तयार करण्यात आले होते. याची बाजारातील किंमत २००० रूपये असणार आहे.

बेंगळुरू येथील इंडिया एनर्जी वीकमध्ये सोमवारी (ता.६) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना ते भेट दिले होते. टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून अशाच पद्धतीने व्यापक प्रमाणावर कपडे बनवण्याची कंपनीची योजना आहे. ‘अनबॉटल इनिशिएटिव्ह' असे नाव या योजनेला देण्यात आले आहे. तामिळनाडूतील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीने पंतप्रधान मोदींसाठी हे जॅकेट तयार केले या कंपनीने पीईटी बाटल्यांपासून बनवलेले नऊ रंगांचे कपडे इंडियन ऑइलला दिले. त्यानंतर पंतप्रधानांच्या गुजरातमधील टेलरने या जॅकेटला अंतिम रूप दिले व ते इंडियन ऑईलकडे पाठविले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दरवर्षी १०० दशलक्ष टाकून दिलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. या फेरप्रक्रिया केलेल्या बाटल्यांपासून कपडे तयार केले जातील. चाचणी म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तज्ज्ञांनी हे जॅकेट तयार केले तेच मोदींना भेट देण्यात आले व मोदींनी ते आज परिधान केले होते.

असे एक पूर्ण वेष बनवण्यासाठी सुमारे २८ तर फक्त जॅकेटसाठी १५ बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. कंपनीने दरवर्षी १०० दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल. यापासून बनविलेल्या कॉटनला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो तर पॉलिस्टरला ‘डोप डाईंग' केले जाते. यामध्ये पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. पीईटी बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची ‘आयओसी‘ची योजना आहे.

प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेल्या कपड्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला रंग देण्यासाठी पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. प्रथम बाटलीपासून फायबर तयार केले जाते आणि नंतर त्यापासून सूत तयार केले जाते. सूत नंतर कापड बनवले जाते आणि शेवटी वस्त्र तयार केले जाते.

वैशिष्ट्ये -

अशा जॅकेटची किरकोळ बाजारातील किंमत २००० रुपये

या प्रकारचे कपडे पूर्णपणे हरित तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

यासाठी निवासी भागातून आणि समुद्रातून टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा केल्या जातात.

या कपड्यांवर एक क्यूआर कोड आहे ज्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी तो स्कॅन करावा लागतो.

टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी प्रत्येकी पाच ते सहा बाटल्या वापरल्या जातात.

एक शर्ट बनवण्यासाठी १० तर पेंट बनवण्यासाठी २० प्लॅस्टिक बाटल्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT