पंतप्रधान मोदी sakal
देश

पंतप्रधान मोदी शनिवारी यूपीमध्ये

गंगा एक्सप्रेसवेचा कोनशिला समारंभ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काशीचा कायापालट करणाऱ्या बाबा विश्वनाथ धाम कॉरीडॉरच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी (ता. १८) पुन्हा उत्तर प्रदेशात येतील. गंगा एक्सप्रेस वे या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा कोनशिला समारंभ शहाजहानपूर येथे त्यांच्याहस्ते होईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गानंतर हा देशातील सर्वाधिक अंतराबाबत दुसऱ्या क्रमांकाचा द्रुतगती मार्ग ठरेल.राज्याच्या पूर्व आणि पश्चिम टोकांना जोडण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येईल. मेरठ ते प्रयागराज हा ५९४ किलोमीटरचा टप्पा असेल. दुसऱ्या टप्प्यात उत्तराखंडच्या सीमेपर्यंत मार्ग जोडण्यात येईल. प्रकल्पाच्या अंतर्गत शहाजहानपूर जिल्ह्यात हवाई धावपट्टी बांधण्यात येईल. आणीबाणीची परिस्थिती तसेच हवाई दलाच्या विमानांसाठी तिचा वापर केला जाईल.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार कोरोनाचा कहर सुरु असतानाही भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली नाही.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • ५९४ किमी अंतर

  • ९ सार्वजनिक सुविधा केंद्रे

  • ३८१ भुयारी मार्ग

  • १४ मोठे पूल

  • ३६२३० कोटी खर्च

  • ७ रेल्वे उड्डाणपूल

  • १२६ लहान पूल

  • १८,५५,००० मार्गालगत झाडे लावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT