Prime Minister, Narendra Modi  
देश

भारत कोरोनावरील लस निर्मितीच्या उंबरठ्यावर : नरेंद्र मोदी

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला विविध पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थितीत होते. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पुढील काही आठवड्यात लस बाजार उपलब्ध होईल. सर्व जगाची नजरही भारतात निर्माण होणाऱ्या लसीवर आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले आहे.

मोदी म्हणाले की, भारत लस बनवण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे. सर्वात प्रथम लस वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टरांना आणि रुग्णांना दिली जाईल. 8  लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात सुरु असून पुढील काही आठवड्यात लस उपलब्ध होईल, असे मानले जात आहे. देशभरात लस वितरित करण्यासाठी केंद्र आणि राज्य मिळून काम करायचे आहे. यासाठी देशातील कोल्ड चेन व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. 

कोरोनावरील लशीसंदर्भात सर्व पक्षांनी विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत लस वितरणासंदर्भात चर्चा झाली. त्यांच्याकडून काही सूचनाही मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मेड इन इंडियाच्या माध्यमातून लशीवर काम करणाऱ्या वैज्ञानिंकाशीही चर्चा केल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली. जगभरात लस निर्मितीची चर्चा सुरु असून जगाची नजरही स्वस्त लस उपलब्ध करुन देणाऱ्या लशीवर आहे. जगाच्या नजरा या भारतावर खिळल्या आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Solapur Crime:'अक्कलकोटच्या व्यापाऱ्यास १५ लाख रुपयांना गंडवलं; ब्रोकरमार्फत मुंबईहून मागवलेले खाद्यतेल आलेच नाही!

SCROLL FOR NEXT