Narendra-Modi 
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील कंपन्यांना आवाहन

पीटीआय

नवी दिल्ली - आरोग्य, पायाभूत सुविधा, संरक्षण, ऊर्जा, विमा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील कंपन्यांना केले. भारतामध्ये गुंतवणुकीच्या भरपूर संधी व पर्याय आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जगाला चांगल्या भविष्याची गरज आहे हे आपण सर्वजण मान्य करतो. आपल्या सर्वांनाच एकत्रितरित्या भविष्याला आकार द्यायचा आहे. भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक मनुष्य केंद्रित असणे आवश्यक आहे,’ असे मत मोदी यांनी व्यक्त केले. अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समीटमध्ये बोलताना पंतप्रधानांनी हे आवाहन केले. ‘आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. 

संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख भागीदार - पॉम्पिओ
‘भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार आहे,’ असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले. तसेच पुढील जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताचे मोठे सहकार्य - केनेथ जस्टर
`भारताने जगभरातील १०० हून अधिक देशांना औषधे उपलब्ध करून दिली आहेत. दोन्ही देशांमधील सहकार्य उत्तम आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा संभाषण झाले आहे. आम्ही मैत्रीचे रुपांतर सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारीत रूपांतरीत केले आहे ,’ असे मत अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी व्यक्त केलं.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मतदार यादीतून नाव गायब... मग रेशनही बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिलं मोठं स्पष्टीकरण

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

SCROLL FOR NEXT