Most Powerful Indian  esakal
देश

Most Powerful Indian: सर्वाधिक शक्तीशाली भारतीय ठरले PM मोदी; अमित शाह, योगी, राहुल गांधी कितव्या स्थानी?

Narendra Modi became the most powerful Indian 2024 :सर्वाधिक शक्तीशाली भारतीयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सर्वाधिक शक्तीशाली भारतीयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आहेत. 'सर्वाधिक शक्तीशाली भारतीय २०२४' यादीमध्ये पहिल्या दहा व्यक्ती कोण आहेत, हे आपण जाणून घेऊया.

पहिल्या दहा जणांमध्ये जास्त करुन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचे नेते आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या २०२४ च्या 'IE 100 यादी'मध्ये भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचाही समावेश आहे. या यादीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी १६ व्या स्थानी आहेत. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अठराव्या स्थानी आहेत.(Prime Minister narendra Modi became the most powerful Indian 2024 Amit Shah Yogi Rahul Gandhi at what position)

कोण आहेत टॉप 10 भारतीय? (Most Powerful Indian)

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी

२. गृहमंत्री अमित शाह

३. मोहनभागवत

४.डी.वाय. चंद्रचूड

५. एस जयशंकर

६. योगी आदित्यनाथ

७. राजनाथ सिंह

८. निर्मला सीतारमण

९. जे. पी. नड्डा

१०. गौतम अदानी

पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आहेत. त्यांचे 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ९.५६ कोटी फॉलोवर्स आहेत. जगातील कोणत्याही नेत्यापेक्षा ते सर्वाधिक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अमित शाह आहेत. त्यांना राजकारणातील चाणक्य मानलं जातं. त्यांच्या नेतृत्वात भाजपने बरीच प्रगती केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. सरन्यायाधीश हे यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याची कारकीर्द लोकांना लक्षात राहण्यासारखी आहे.

परराष्ट्रमंत्री एक जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणांमध्ये आपली चमक दाखवली आहे. त्यांनी अनेक देशांसोबत राजनैतिक संबंध निर्माण केले आहेत. ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. यादीमध्ये योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर आहेत. ते हिंदू नेता म्हणून ओळखले जातात, तर सातव्या क्रमांकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत.

आठव्या क्रमाकांवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आहेत. त्या सर्वाधिक काळ अर्थमंत्रीपदी राहणाऱ्या महिला नेत्या आहेत. त्यांच्या काळात भारताचा विकास दर वाढला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना यादीमध्ये नववे स्थान आहे. यादीमध्ये दहाव्या स्थानी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आहेत. अकराव्या स्थानी मुकेश अंबानी आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT