Prime Minister Narendra Modi criticizes Mamata over Vote Jihad no reservation  Sakal
देश

PM Modi : ‘व्होट जिहादीं’ ना आरक्षण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ममतांवर टीका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांमधील ७७ समूहांना ओबीसी अंतर्गत दिलेले आरक्षण कलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द ठरविले आहे

सकाळ वृत्तसेवा

बारासात : ‘‘तृणमूल काँग्रेसने इतर मागासवर्गीयांचा विश्वासघात केला आहे. लाखो युवकांना राज्यघटनेने दिलेला अधिकार तृणमूल काँग्रेसने एका रात्रीत हिरावून घेतला आणि ‘व्होट जिहाद’ करणाऱ्यांना दिला’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील अशोकनगर येथील सभेदरम्यान केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांमधील ७७ समूहांना ओबीसी अंतर्गत दिलेले आरक्षण कलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द ठरविले आहे, त्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्यावर टीका केली. तृणमूल काँग्रेसने लाखो युवकांना राज्यघटनेने दिलेला अधिकार एका रात्रीत हिरावून घेत व्होट जिहाद करणाऱ्यांना दिला’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

आरक्षणाबाबत निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या घरी तृणमूलने गुंड वगैरे पाठविले की काय हे पाहायला हवे, असेही मोदी म्हणाले. ‘‘न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तृणमूलच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला ज्या पद्धतीने विरोध केला ते ऐकून मला धक्का बसला. जो कोणी त्यांचे पितळ उघडे पाडेल त्यांना लक्ष्य करत आहे. असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.

कायद्याचे राज्य संपविले: राहुल

‘भाजप नेहमीच अत्याचार करणाऱ्यांचे समर्थन करतो’, असा आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्याचे राज्य संपविल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेशात एका दलित परिवारावर भाजपच्या नेत्यांनी केलेल्या अत्याचारावर ‘एक्स’ या सोशल मीडियावर व्यक्त होताना राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT