pm modi statue of unity 
देश

'लिबर्टी'पेक्षा 'युनिटी'चा पुतळा पहायला येतात सर्वधिक लोक; 8 नव्या रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले PM मोदी

सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी गुजरातच्या केवाडियामध्ये व्हिडीओ कॉन्फरंन्सिद्वारे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडणाऱ्या आठ रेल्वेंचा सकाळी 11 वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभांरभ केला. या रेल्वे केवाडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पासून वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरशी जोडल्या जाणार आहेत. केवाडिया रेल्वे स्टेशन अनेक सोयी-सुविधांनी युक्त आहे. हे देशातील पहिले ग्रीन बिल्डींग सर्टिफिकेट वाले रेल्वे स्टेशन आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, रेल्वेच्या इतिहासात कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल जेंव्हा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून एकाच ठिकाणासाठी एवढ्या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला गेला असेल. केवाडिया ही जागा देखील अशीच आहे. देशाला एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र देणाऱ्या सरदार पटेलांच्या सर्वांत उंच प्रतिमेमुळे या जागेची ओळख बनली आहे. केवाडिया रेल्वे कनेक्टिविटीमुळे आदिवासी लोकांचं आयुष्य देखील बदलणार आहे. 

पुढे त्यांनी म्हटलं की, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून अधिक पर्यटक इथे येत आहेत. लोकार्पणानंतर जवळपास 50 लाख लोकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलेली आहे. यासोबतच केवाडियामध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. रेल्वेमध्ये नव्या विचारांसह, नव्या तंत्रज्ञानासह काम चालू आहे. भारतीय रेल्वेमध्ये देखील सरदार पटेलांच्या स्वप्नांचा संगम आहे. 

देशात रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासहित आज देशाच्या त्या भागाशी रेल्वेला जोडलं जात आहे जे आतापर्यंत जोडले गेले नव्हते. आज आधीपेक्षा अधिक गतीने जुन्या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जात आहे. रेल्वे ट्रॅकला अधिक गतीसाठी सक्षम केलं जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.

या मार्गाच्या रेल्वेंचा PM मोदींनी केला शुभारंभ

  • 09103/04 केवाडिया-वाराणसी महामना एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 2927/28 दादर-केवाडिया एक्सप्रेस (दैनिक)
  • 09247/48 अहमदाबाद-केवाडिया जनशताब्दी एक्सप्रेस (दैनिक)
  • 09145/46 निजामुद्दीन-केवाडिया संपर्क क्रांती एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
  • 09105/06 केवाडिया-रीवा एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 09119/20 चेन्नई-केवाडिया एक्सप्रेस (साप्ताहिक)
  • 09107/08 प्रतापनगर-केवाडिया मेमू ट्रेन (दैनिक)
  • 09109/10 केवाडिया-प्रतापनगर मेमू ट्रेन (दैनिक)
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Who is Sanjita Mohapatra? : सत्यम गांधींची तडकाफडकी बदली! आता 'या' डॅशिंग महिला अधिकारी सांभाळणार सांगली महापालिकेचा कारभार

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

SCROLL FOR NEXT