modi_karunanidi_death
modi_karunanidi_death 
देश

मोदींसह अनेक दिग्गजांनी घेतले करूणानिधींचे अंत्यदर्शन

सकाळवृत्तसेवा

चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.  

चेन्नईतील राजाजी हॉल येथे करूणानिधींचे पार्थिव हे अंत्यदर्शनाशाठी ठेवण्यात आले आहे. या वेळी राजकीय, सामाजिक, कला अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गज करूणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी हजर होते. नुकतेच राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते रजनीकांत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे करूणानिधींना श्रद्धांजली अर्पित केली. थोड्याचवेळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही येथे अंत्यदर्शनासाठी दाखल होतील.

करूणानिधींच्या अंत्यविधीसाठी डीएमके पक्षाने मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे मरीना बीचवरच होतील. काल (ता. 7) संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात करूणानिधी यांचे निधन झाले. त्यानंतर आज (ता. 8) पहाटे राजाजी हॉल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले. करूणानिधींना शेवटचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच सर्व क्षेत्रातील दिग्गज व सामान्य कार्यकर्त्यांची रीघ राजाजी हॉलबाहेर लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT