Prime Minister Narendra Modi 
देश

PM नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान रुग्णवाहिकेला दिला रस्ता!

Sandip Kapde

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये त्यांच्या रोड शो दरम्यान रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी त्यांचा ताफा थांबवला. वाराणसीच्या त्यांच्या 2 दिवसीय दौऱ्यावर, PM मोदी वाराणसी आणि पूर्वांचलसाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 37 प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. ते नमो घाट येथून काशी तमिळ संगम 2.0 लाँच करतील आणि कन्याकुमारी ते वाराणसी या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

नरेंद्र मोदी आज रोजी नमो घाटावर आयोजित काशी तमिळ संगमच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भारत संकल्प यात्रा प्रदर्शनालाही भेट देणार आहोत. यानंतर नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधतील आणि अभिप्रायही घेतील. काशी-तमिळ संगमच्या उद्घाटन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत.

18 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना करणार आहेत. यानंतर स्वरवेद मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी सेवापुरी विधानसभेत जाहीर सभेने निवडणुकीची सुरुवात करतील.

वाराणसीतील विश्वनाथ धामच्या उद्घाटनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त येथे विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण धाम दिव्यांनी उजळून निघाला. काही ठिकाणी ओम नमः शिवाय तर काही ठिकाणी दिव्यांच्या सजावटीने मंदिरांमध्ये वेगळेच वातावरण निर्माण केले होते. गंगेच्या काठापासून संपूर्ण मंदिर चौक आणि त्यानंतर मंदिर परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News : सोशल मीडियावरील चर्चांनंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील स्वतः आले समोर! साताऱ्यातील 'त्या' घटनेचे सांगितले सत्य; मद्यधुंद व्यक्तीबाबत नक्की काय घडलं?

Rohit Sharma चा पत्ता कट केला, आता विराट कोहलीचा नंबर? गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यात ऐकी; पडद्यामागे काय शिजतंय?

Latest Marathi News Live Update : युद्ध आणि इंधन संकट असूनही भारताच्या विकासाची गाडी थांबलेली नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mahavitaran PRO Suspended : कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तडकाफडकी निलंबीत, स्मार्ट मिटर कॅमेरा प्रकरण भोवलं; प्रशासकीय विभागात खळबळ

IND vs ENG : पहिल्या वन डेतील मॅच विनर मालिकेतून बाहेर; निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT