देश

स्वातंत्र्यदिनी ऑलिम्पिक पथक असणार विशेष अतिथी; PM मोदीही भेटणार

विनायक होगाडे

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी अद्यापतरी जेमतेमच राहिली आहे. ११ दिवसांनंतर भारताला फक्त दोनच पदके मिळाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या रजत पदकाचा तर बॅडमिंटनपट्टू पीवी सिंधू यांच्या कांस्य पदकाचा समावेश आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सेमी फायनलला पोहोचला होता. मात्र, संघाला बेल्जियमकडून पराभवाचा धक्का बसला. हा सामना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला. पराभव आणि विजय हे जीवनाचाच भाग आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ खेळी केली, अशी कौतुकाची थापही मोदी यांनी दिली आहे. मात्र, तुमची 'पनौती' लागली असल्याची टीका नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली पहायला मिळत आहे. सध्या #Panauti हा ट्रेंड टॉपमध्ये आहे. सध्यातरी आणखी काही पदके मिळतील, या आशेवर भारतीय खेळाडूंचा चमू आहे.

दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिम्पिक दलाला एक विशेष अतिथीच्या स्वरुपात लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. तसेच ते त्या सर्व खेळाडूंशी वैयक्तिकरित्या भेटून बातचित देखील करणार आहेत. तसेच त्यांना आपल्या निवासस्थानी देखील बोलावणार आहेत. सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील खेळाडूंचे सर्वांत मोठे दल पोहोचले आहे. या चमूमध्ये १२७ खेळाडू आहेत. वेगवेगळ्या खेळांमध्ये ते देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT