Prithviraj Chavan

 

esakal

देश

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

Prithviraj Chavan Controversial Statement : जाणून घ्या, ऑपरेशन सिंदूरबाबत नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपने त्यावर काय केली आहे टीका?

Mayur Ratnaparkhe

Prithviraj Chavan stands firm on the Operation Sindoor controversy : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशीही मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे.

असे असतानाही पृथ्वीराज चव्हाण मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत. याबाबत त्यांनी ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी माफी का मागू? मला संविधानाने प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. मी काही चुकीचं बोललो नाही. यावर मी नंतर आरामात, सविस्तर बोलेन.’’, अशी प्रतिक्रिया मीडियाला दिली आहे.  तर पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता भाजपची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 ‘’ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आणि भारतीय हवाई दल पूर्णपणे ठप्प होते.’’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं समोर आलंय. तर भारतीय जनता पक्षाने चव्हाण यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार करतो आणि सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच, पृथ्वीराज चव्हाण असंही म्हणाले  की,  ७ मे रोजी सुमारे अर्धा तास चाललेल्या हवाई युद्धात भारतीय बाजूचे मोठे नुकसान झाले, लोक यावर विश्वास ठेवोत किंवा न ठेवोत. एवढच नाहीतर त्यांनी असाही दावा केला की, यादरम्यान भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि हवाई दलाचे एकही विमान उड्डाण करू शकले नाही.

याशिवाय, पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केलाय, की ऑपरेशन सिंदूरबद्दलचे संपूर्ण सत्य देशासमोर आलेले नाही. त्यांनी म्हटले की, युद्धात नुकसान होणे सामान्य आहे, परंतु सरकार काही तथ्ये लपवत आहे. लष्करी पातळीवर रणनितीक त्रुटी मान्य केल्या जात असताना, सरकार सत्य समोर येण्यापासून रोखत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

Kolhapur Bus Tragedy : जिथं पत्नी-मुलांना गमावलं... तिथंच पुण्यातील विराट यांनी संपवलं आयुष्य; कोल्हापूरातील घटना डोळ्यात पाणी आणणारी

Vasai: अमली पदार्थ तस्कारांची धरपकड! वसई, मिरा-भाईंदर शहरातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

SCROLL FOR NEXT