priyanka gandhi statement on pm modi donated 21 rupees fact check BJP VS Congress marathi news  
देश

Priyanka Gandhi : PM मोदींनी खरंच दानपेटीत २१ रुपये टाकले? प्रियंका गांधींना EICची नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या होत्या?

रोहित कणसे

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी राजस्थानमध्ये एका भाषणात केलेल्या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. फक्त भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात असतानाच निवडणूक आयोगाने देखील त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना ३० ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यावर उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. यादम्यान भाजप नेत्यांने प्रियंका गांधी यांच्यावर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. नेमकं प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या आणि त्यामागचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या?

प्रियंका गांधीच्या ज्या वक्तव्यामुळे वाद सुरू आहे ते त्यांनी २० ऑक्टोबर रोजी दौसा येथे केलं होतं. येथे एका सभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, नुकतेच मी टीव्हीवर पाहिलं, मला माहिती नाही की ते खरं आहे की खोटं. पंतप्रधान देवनारायणा मंदिरात गेले होते आणि दानपात्रात त्यांनी एक लिफाफा टाकला. लोकांना प्रश्न पडला की त्यामध्ये काय असेल, मात्र जेव्हा लोकांनी तो उघडला तर त्यामध्ये अवघे २१ रुपये आढळले.

हा व्हिडीओ कुठला आहे?

या लिफाफ्याबद्दल बोलायचे झाल्यास मागील काही दिवसांपूर्वी देवनारायण मंदिरातील पुजाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते मंदिरातील दानपात्र उघडत होते. त्यामध्ये एक लिफाफा पाहूण त्यांनी दावा केला होता की हा लिफाफा पीएम मोदींनी दिला होता आणि यामध्ये फक्त २१ रुपये निघाले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि लोक यावर वेगवेगळ्या कंमेंट्स करु लागले. हा व्हिडीओ मीडियामध्ये देखील चर्चेचा विषय बनला होता.

सत्य काय आहे?

पीएम मोदींनी २८ जानेवारी रोजी भीलवाडा येथील देवनारायण मंदिरात गेले होते. भगवान देवनारायण यांचा ११११ अवतण मोहत्सवात त्यांनी सहभाग घेतला. येथे पूजा केल्यानंतर त्यांनी दानपात्रात दान देखील केलं होतं. मात्र, पुजाऱ्याकडून सांगण्यात आलेल्या गोष्टीची सत्यता तपासल्यानंतर ती बाब खोटी असल्याचे उघड झाले आहे. त्या दिवशीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की, मोदींनी लिफाफा नाही तर काही नोटा दानपात्रात टाकल्या होत्या. तसेत मोदींनी किती पैसे टाकले याबद्दल स्पष्टता नाहये. मात्र त्यांनी फक्त लिफाफा टाकल्याचा दावा खोटा आहे.

प्रियंका गांधी यांन सभेत बोलताना पीएम मोदी यांनी २१ रुपये असलेला लिफाफा टाकल्याचा उल्लेख केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून प्रियंका गांधींवर फेक न्यूज पसरवल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT