

Kolhapur Zilla Parishad Shirol results
esakal
Political news Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निकालांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून विविध तालुक्यांत विजय–पराभवाचे निकाल समोर येऊ लागले आहेत. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला गड राखला असून नंदिनी कांबळे या विजयी झाल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी एकत्र येत निवडणूक लढवून भाजप व राजर्षी शाहू विकास आघाडीला थेट आव्हान दिले होते. विनय कोरे यांच्या ४ उमेदवारांनी विजय खेचून आणला आहे.