Priyanka Gandhi Priyanka Gandhi
देश

UP Elections : ‘जो महिलांची चेष्टा करेल, तो स्वत: हरेल’

महिला ही देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे

सकाळ डिजिटल टीम

महिलांना राजकारणात कोणी गांभीर्याने का घेत नाही हे समजून घेतले पाहिजे. यावर विचार करण्याची गरज आहे. महिलांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. महिलांनी एकजुटीने मतदान केले तर अशी परिस्थिती येणार नाही. महिलांनी खूप त्रास सहन केला, खूप गप्प राहिलो. परंतु, आता असं होणार नाही, असे प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी (Uttar Pradesh elections) प्रियांका गांधी राज्याचा मॅरेथॉन दौरा करीत आहे. प्रियांका शनिवारी अमेठीत (Amethi) होती. रविवारी तिने रायबरेलीच्या (Raebareli) महिलांशी संवाद (Interact with women) साधला. आपण देशाच्या निम्मी लोकसंख्या आहोत, तरीही राजकारणात गांभीर्याने का पडलो नाही, हे समजून घेतले पाहिजे, असेही प्रियांका म्हणाली. जी घोषणा केली जाते, त्याचा निवडणुकीनंतर विसर पडतो. मग जातीयवाद आणि जातिवाद दाखवला जातो. हे राजकारण आपण थांबवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

महिला ही देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे. महिला खूप हुशार असतात, त्यांची दिशाभूल करता येत नाही. आमच्याकडे महिलांकडून भरपूर अर्ज येत आहेत. आमच्याकडे साधनांची कमतरता नाही. संसाधने आमच्याकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) आठ हजार कोटींचे विमान उडवण्याइतके साधन आहे. परंतु, चार हजार कोटींचा ऊस शेतकऱ्यांना द्यायला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) संसाधनांचा गैरवापर करीत आहेत, असेही प्रियांका (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

महिलांचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला काही नेत्यांनी विरोध केला तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही आमची मोहीम सुरू केल्यापासून सर्वच पक्ष काही ना काही घोषणा करीत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. राजकारणात असेच बदल घडतील. महिलांचे सक्षमीकरण होत आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते अस्वस्थ होत आहेत. राजकारणात उतरण्यासाठी आणि जिंकण्यासाठी महिलाही संघर्ष करतील. ज्यांना विनोद करायचा आहे ते विनोद करत राहतात. देशातील महिलांची जो चेष्टा करेल, तो स्वत: हरेल, असेही प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT