देश

'ज्या प्रॉपर्टीवर योगी बसलेत, ती जनता जप्त करु शकते'; प्रियांकांचा हल्लाबोल

विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊ ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय शेरेबाजीला देखील उत आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत कमबॅक करण्याची आशा धरुन आहे. तर भाजप सत्तेवर आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी स्वत:ला तयार करतो आहे. आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांना सत्तेचा दुरुपयोग करत धमकावणे हा सर्वांत गंभीर गुन्हा असल्याची जोरदार टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या चुकीच्या कृत्याबद्दल प्रॉपर्टी जप्तीच्या ट्विटवर प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर देत हे ट्विट केलं आहे. (Priyanka Gandhi Vadra Property Yogi Adityanath is sitting belongs to people can be confiscated by them)

योगी आदित्यनाथ यांनी काल बुधवारी ट्विट करत राज्यातील तरुणांना आवाहन केलंय की त्यांनी कुणाच्याही प्रभावाखाली येऊन स्वत:ची दिशाभूल करुन घेऊ नये. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यातील युवकांना माझी विनंती आहे की त्यांनी कुणाच्या प्रभावाखाली येऊ नये. आज कुणीही चुकीचं काम करु शकत नाही. ज्यांना आपली प्रॉपर्टी जप्त करायची असेल, त्यांनी चुकीचं कार्य करावं.

योगी आदित्यनाथ यांचं हे ट्विट टॅग करत त्याला प्रत्युत्तरादाखल प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर देणारं ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, या देशात आपला आवाज उठवणे, निषेध करणे आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा एक संवैधानिक अधिकार आहे. योग्य मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांना भीती घालणे आणि त्यांना धमकावण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे हा एक मोठा गंभीर अपराध आहे. ज्या 'प्रॉपर्टी'वर योगीजी बसले आहेत, ती त्यांची नाहीये. देशातील जनतेची आहे. लक्षात असुद्या की, ती 'प्रॉपर्टी' देखील जनता एक दिवस जप्त करु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT