Cheetah Project India esakal
देश

Project Cheetah 2: आता दुसरा टप्पा! भारतात पुन्हा परदेशातून येणार चित्ते, सरकारी अधिकाऱ्यांची माहिती

दुसऱ्या खेपेतील चित्त्यांना 'या' राज्यातील अभयारण्यात ठेवण्यात येणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफ्रिका खंडातील नामिबिया या देशातून चित्ते आणून ते भारतात वसवण्याच्या केंद्र सरकारच्या पहिल्या प्रयोगात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यानंतरही याचा याचा दुसरा टप्पा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा अफ्रिकेतून भारतात चित्त्यांची खेप येणार आहे. पर्यावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Project Cheetah 2 again Cheetah will come to India from Africa government officials gives info)

'या' देशातून येणार चित्ते

पर्यावरण मंत्रालयात वन विभागाचे अतिरिक्त महानिदेशक एस पी यादव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या योजनेबाबत माहिती दिली. यादव हे राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे प्रमुखही आहेत. त्यांनी सांगितलं की, "चित्त्यांची पुढची बॅच दक्षिण अफ्रिकेतून आयात केली जाणार आहे. यावेळी आलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात ठेवण्यात येईल. या वर्षाच्या शेवटी हे चित्ते भारतात दाखल होतील" (Latest Marathi News)

'या' अभयारण्यात होणार पुनर्वसन

चित्ता अॅक्शन प्लॅनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं कुनो अभयारण्यात २० चित्ते राहतील एवढी क्षमता आहे. सध्या या ठिकाणी चित्त्याच्या एका बछड्यासह १५ चित्ते आहेत. देशात आम्ही चित्त्यांची दुसरी खेप आणू तेव्हा त्यांना देशातील इतर ठिकाणी ठेवण्यात येईल. मध्य प्रदेशात आम्ही दोन ठिकाणं चित्त्यांच्या अधिवासासाठी तयार करत आहोत. यांपैकी एक गांधी सागर अभयारण्य तर दुसरं नौरादेही अभयारण्य आहे. (Marathi Tajya Batmya)

'या' महिन्यात होणार आगमन

गांधी सागर अभयारण्यात वेगानं तयारी सुरु असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत ही तयारी पूर्ण होईल. आधिवास पूर्णपणे तयार झाल्यानंतर आम्ही एकदा या साईटला भेट देऊ त्यानंतर चित्त्यांना आणण्याचा निर्णय घेऊ, असंही यादव यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT