Prophet Muhammad Row
Prophet Muhammad Row esakal
देश

पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नुपूर शर्मानं एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती.

प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्या विरोधात टिप्पणी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मासह (Nupur Sharma) 9 जणांवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुन्हा दाखल केलाय. विशेष सेलच्या सायबर युनिटनं एफआयआर (FIR) नोंदवला आहे. या सर्व लोकांवर धर्माविरोधात अशोभनीय वक्तव्य करून वातावरण बिघडवल्याचा आरोप आहे.

नुपूर शर्मा व्यतिरिक्त सायबर युनिटनं भाजपचे माजी प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलान मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नुपूर शर्मानं एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. भाजपनं नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलंय. असं वक्तव्य भाजपच्या मूळ कल्पनेच्या विरोधात असल्याचं पत्र भाजपकडून (BJP) जारी करण्यात आलंय.

नूपुर शर्मानं मागितली माफी

पक्षातून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितलीय. त्या म्हणाल्या, 'मी माझे शब्द परत घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या बोलण्यानं कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द परत घेते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT