pune sakal
देश

शाळांसाठी ‘हायब्रिड मॉडेल’चा प्रस्ताव

ऑनलाइन व ऑफलाइनचे मिश्रण ; टास्क फोर्सची सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी काही विद्यार्थी ऑनलाइन, तर काही विद्यार्थी ऑफलाइन अशा प्रकारे ‘हायब्रिड मॉडेल’चा विचार व्हावा, अशी सूचना राज्य बालरोग टास्क फोर्सचे प्रमुख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल पारेख यांनी केली आहे. (MAHARASHTRA News)

शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि मानसिकतेचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. स्कूल बसमध्ये मर्यादित विद्यार्थी, वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी, तसेच विद्यार्थी एकत्र येतील, असे सांघिक खेळ वा कृती टाळाव्या लागतील. यासाठी शाळा वेगवेगळ्या सत्रांमध्ये भरवाव्या लागतील. त्यासाठी काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन सत्रात, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन सत्रात सहभागी करून घ्यावे लागेल. अशा पद्धतीने ‘हायब्रिड मॉडेल’चा अवलंब करून शाळा सुरू करता येईल, असे मत डॉ. पारेख यांनी मांडले.

सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना डेल्टा विषाणूचा धोका काहीसा कमी आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी दिली. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही किंवा आतापर्यंत कोरोनाही झाला नाही, अशा व्यक्तींमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडी तयार न झाल्यास त्यांना डेल्टाची बाधा होण्याची शक्यता आहे. अनेक लहान मुलांना कोविडची बाधा होऊनदेखील सौम्य लक्षणामुळे समजले नाही. तसेच लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा कोविड होण्याची शक्यता फार कमी आहे; तरीही शाळा सुरू करताना प्रशासनाने योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. दलवाई म्हणाले. राज्य सरकारकडूनही संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी केली जात आहे.

राज्यात २८ दिवसांत पाच हजार मुलांना संसर्ग

राज्यातील शून्य ते १० वयोगटातील दोन लाख पाच हजार ५९५ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. २८ दिवसांपूर्वी राज्याने याबाबतीत दोन लाखांचा टप्पा पार केला होता. तसेच लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण त्यावेळी ०.९२ टक्के होते. ते वाढून आता ०.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. एक ऑगस्टपर्यंत राज्यातील शून्य ते १० या वयोगटातील दोन लाख ३०५ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. २८ दिवसांत तब्बल पाच हजार नव्या बालकांची नोंद वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालात केली आहे.

लहान मुलांमध्ये लस घेतल्यानंतर लगेच प्रतिकारशक्ती तयार होत नाही. लसीकरण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे लसीकरण आणि शाळा सुरू होणे हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत.

- डॉ. समीर दलवाई, बालरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT