Narendra Modi 
देश

Narendra Modi : मोदींची होते 'परीक्षा पे चर्चा' पण सरकारचे खर्च होणार ९ कोटी! समोर आली आकडेवारी...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद कार्यक्रम "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमावरील खर्चात सुमारे ६ टक्क्यांनी वाढ केली आहे. पुढील वर्षी ९ कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही माहिती शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्त दस्तऐवजातून प्राप्त झाली आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. 

प्रकल्प मंजुरी मंडळाच्या दस्तऐवजानुसार, परीक्षा पे चर्चा - २०२३ च्या कार्यक्रमाचे २७ जानेवारीला आयोजन करण्यात आले होते. यावर जवळपास ८.५० करोड रुपये खर्च करण्यात आले होते. 

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ६ फेब्रुवारी रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद कार्यक्रमात २०१८ मध्ये ३.६७ कोटी रुपये, २०१९ मध्ये ४.९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०२० मध्ये ५.६९ कोटी रुपये, २०२१ मध्ये ६ कोटी रुपये आणि २०२२ मध्ये ८.६१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१८ मध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमास सुरूवात झाली होती. आतापर्यंत या कार्यक्रमाचे सहावेळा आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, प्रकल्प मंजुरी मंडळाच्या माहितीनुसार २०२४ मध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात जवळपास ९ करोड रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव केला गेला आहे. यामध्ये अ‍ॅडव्हान्स म्हणून ३.६० कोटी रुपये दिले जाऊ शकतात. उर्वरित रक्कम कार्यक्रमाच्या आयोजनानंतर देण्यात येणार आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये या कार्यक्रमाच्या खर्चात ६ टक्के वाढ करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

SCROLL FOR NEXT