rakesh tikait 
देश

देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा; राकेश टिकैत संतापले

कार्तिक पुजारी

भारतीय जनता पक्षाच्या बैठकीविरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याप्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपला राग व्यक्त केला आहे

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाच्या बैठकीविरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याप्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपला राग व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देशातील तालिबानी कमांडरनी आदेश दिला होता, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपच्या बैठकीविरोधात निदर्शने करण्यासाठी करनालकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाथीचार्ज केला होता. यामध्ये जवळपास 10 शेतकरी जखमी झाले. (farmer protest latest news)

जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजप सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी एएनआयशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, देशात सरकारी तालिबान्यांचा कब्जा झाला आहे. देशात सरकारी तालिबानी कमांडर उपस्थित आहेत. या कमांडरची ओळख झाली पाहिजे. ज्यांनी डोके फोडण्याचा आदेश दिला ते कमांडर आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्य भाजपचे अध्यक्ष ओम प्रकाश धनखड आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक नियोजित होती. याला विरोध करण्यासाठी शेतकरी निदर्शने करत होते. त्यांना पांगवण्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईवर टीका होत आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केलाय की, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधात शनिवारी टोल प्लाझा अडवण्यात आला आणि आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फतेहगड- चंडीगड, गोहाना-पानिपत आणि जिंद-पतियाळा या महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. अंबाला- चंडीगड आणि हिसार- चंडीगड हे महामार्ग देखील ठप्प झाले होते. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणांवर शेतकऱ्यांनी महामार्गांवरच खाटा, बांबूचे पलंग आडवे टाकून ठिय्या आंदोलन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT