farners protest 
देश

गृहमंत्री अमित शहांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; आपल्या मागण्यांवर ठाम

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नाहीयेत. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत बुराडी मैदानमध्ये जायला नकार दिला. त्यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पंजाबच्या 32 शेतकरी संघटनांना प्राथमिक बातचीतीसाठी निमंत्रण दिलं. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, आम्ही सरकारसोबत कोणत्याही अटीशर्थीविना चर्चा करु इच्छितो. आता संध्याकाळी चार वाजता गृह सचिवांच्या या प्रस्तावावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. 

अडीच तासांच्या बैठकीत शहांचा प्रस्ताव अमान्य
याआधी आंदोलकांच्या बैठकीत अमित शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी अमान्य केला होता. शहा यांनी प्रस्ताव दिला होता की, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे फक्त, त्यांनी बॉर्डरवरुन हटून दिल्लीच्या बुराडीमधील निरंकारी समागम मैदानात आंदोलन करावं. सकाळी जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत ही अट अमान्य केली गेली. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते केंद्र सरकारशी कोणत्याही अटी-शर्थीविना चर्चा करु इच्छित आहेत. आता सायंकाळी चार वाजता परत एकदा संयुक्त किसान मोर्चाची बैठक  होणार असल्याची माहिती समोर येतीय. या बैठकीत शेतकरी अमित शहा यांच्या प्रस्तावावर काय निर्णय घेतील, हे पाहणं निर्णायक ठरणारे.

हेही वाचा - PUC सर्टिफिकेट नसेल तर आता RC जप्त; 1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम कडक​
घरातून अन्न-धान्यासह निघालेत शेतकरी
आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा निर्धार अगदी पक्का असल्याचं दिसून येतंय. नव्या कृषी कायद्याविरोधात अगदी ठामपणे निकराचा लढा देण्याचं या शेतकऱ्यांनी ठरवल्याचं गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरुन स्पष्ट झालं आहे. हे आंदोलनकर्ते घरातून रेशन-पाणी, अंथरुन-पांघरुन घेऊनच निघाले आहेत. ऐन थंडीतही त्यांचा निश्चय ढळलेला नाहीये. या आंदोलनात महिला आणि लहान मुलेही सामिल आहेत. या सगळ्यांचीच मागणी आहे की नवे कृषी कायदे जुलमी असून ते मागे घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

SCROLL FOR NEXT