Malvika Sood with Sonu Sood 
देश

राजकारणात तू कधी उतरणार? बहिणीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सोनू सूदने दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांना केलेल्या मदतीमुळे सिने अभिनेता सोनू सूद चांगलाच चर्चेत आला होता. त्याने केलेल्या मदतीची भरपूर चर्चा झाली आणि त्याचं कौतुकही झालं. येत्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोनू सूदची बहिण मालविका सिंग काँग्रेस पक्षाकडून मोगा या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून मैदानात उतरली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Malvika Sood with Sonu Sood) तिच्या प्रचारासाठी सोनू सूदही आता रस्त्यावर उतरलेला दिसून येतो आहे.

पंजाबमधील राजकीय परिस्थितीबाबत सोनू सूदने एनडीटीव्हीशी बातचित करताना अनेक मुद्यांवर मते मांडली आहेत. त्यावेळी त्याने म्हटलंय की, माझा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाहीये. मी फक्त माझ्या बहिणीला पाठिंबा देतो आहे. मी आधीपासूनच म्हटलं होतं की, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीये. मी एक अभिनेता आहे तर माझी बहिणी सामाजिक कार्यकर्ती आहे. मोगा मध्ये जेवढे शाळा-कॉलेजेस आणि धर्मशाळा आहेत ते माझ्या कुटुंबियांनीच बांधलेले आहेत.

माझ्या आईने अनेक मुलांना मोफत शिकवलं आहे. आमची समाजसेवा पाहून लोकांनीच मालविकाला राजकारणामध्ये आणलं आहे. तुम्ही सिस्टीममध्ये आलात तर अधिक कामे होतील, अशा आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.

बहिणीसाठी काँग्रेस पक्षच का निवडला? या प्रश्नावर सोनूने म्हटलंय की, पंजाबमध्ये काँग्रेसने मोठं योगदान दिलं आहे. असं कोणतंच सरकार नसतं ज्याच्यावर लोक शंभऱ टक्के समाधानी असतात. मोगामध्ये काँग्रेसचं नेहमी येते कारण पंजाबमध्ये काँग्रेसने मोठं काम केलंय. मोगामध्ये काँग्रेसकडून जर मालविकाला जागा मिळाली तर एक चांगला रस्ता मिळेल. आम्हाला असं वाटलं की, आम्हाला जी स्पेस हवीये ती इथे मिळेल.

आम आदमी पक्षामध्ये तुम्ही जाल, अशी चर्चा होती, त्यावर काय सांगाल या प्रश्नावर सोनू सूद म्हणाला की, मी दिल्ली सरकारच्या प्रोग्रामचा ब्रँड मॅनेजर झाल्यावर ही चर्चा सुरु झाली, की मी राजकारणात येतोय. मला अनेक ठिकाणाहून अशा ऑफर्स देखील आल्या की, राज्यसभेचा खासदार अथवा मोठी देतो.. मात्र, माझ्याकडे खूपसं काम आधीपासूनच आहे आणि माझ्याकडे मोठी टीमदेखील नाहीये की सक्रीय राजकारण उतरु शकेन. मला असं वाटतंय की यासाठी अजून वेळ आहे. कदाचित आणखी पाच वर्षांनी ती योग्य वेळ असू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवे शिक्षणमंत्री B.A पास , प्रल्हाद जोशींची संपत्ती किती? कोट्यवधींचे मालक तरी ना कार, ना बाइक

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

Tembhu Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! टेंभूला ६९१ कोटी, म्हैसाळ-ताकारीला ९१९ कोटींचा निधी

Pune News: ६ कोटींचे काम रखडले; एम्प्रेस गार्डनसमोरील 'प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह' खड्ड्यांच्या विळख्यात

SCROLL FOR NEXT