Punjab
Punjab  Sakal
देश

भगवंत मान केजरीवालांच्याही पुढं; पंजाबमध्ये 300 नव्हे, 600 युनिट वीज मोफत

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : पंजाबच्या भगवंत मान (Bhagwant Maan) सरकारने मोफत विजेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 300 युनिट नव्हे तर, 600 युनिट मोफत वीज (Frees Electricity) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये येथील नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये घसघशी वाढ करत 300 ऐवजी 600 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री मान यांनी याबाबत स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. (Bhagwant Maan News In Marathi)

मान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये पंजाबच्या जनतेला दिलेल्या मोफत विजेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार पंजाबमधील नागरिकांना प्रत्येक बिलावर 600 युनिट मोफत वीज मिळणार आहे. या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले असल्याचेही मान म्हणाले.

आम आदमी पक्षाच्या (AAM Adami Party) मोफत विजेच्या घोषणेनंतर बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता यावर शिक्कमोर्तब झाले आहे. दिल्लीतील 'आप'च्या नेतृत्वाखालील केजरीवाल सरकार (Kejriwal Government) जनतेला 200 युनिट मोफत वीज देते. त्यानंतर आता पंजाबमध्येही (Punjab) मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपच्या या मोफत वीज घोषणेची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT