Navjot Singh Sidhu Team eSakal
देश

सिद्धूंच्या समर्थनात तीन तासांत तीन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ सुरु आहे.

सुधीर काकडे

पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, काही दिवसांपूर्वीच पंजाबच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या रझिया सुल्ताना यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनात राजीनामा दिला. काही वेळापुर्वीच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये आता राजीनाम्याचं सत्र सुरू झाल्याचं दिसतं आहे. काही वेळापुर्वीच काँग्रेस नेते गुलझार इंदर चहल आणि कॅबीनेट मंत्री रझिया सुल्तान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच पंजाब काँग्रेसचे सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी राजीनामा दिला आहे.

"सिद्धू साहेब तत्त्व पाळणारा माणूस आहे. ते पंजाब आणि पंजाबियत या साठी लढता आहेत" असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

योगिंदर धिंग्रा यांनी पंजाब काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनात राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुल्ताना आणि राज्य पक्षाचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांच्या राजीनाम्यानंतर दिलेला धिंग्रा तिसरा काँग्रेस नेता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT