देश

सुषमा स्वराज ते सोनिया गांधींचे ISI सोबत संबंध? अमरिंदर सिंग यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानी पत्रकार आरुसा आलम यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर सातत्यानं टीका केली जात आहे. पाकिस्तानी पत्रकार आरुसा आलम यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आता पाकिस्तानी पत्रकार आरुसा यांचे आयएसआयशी संबंध असल्यानं कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टार्गेट केलं जात आहे. या सर्वांना अमरिंदर सिंग यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये फोटो पोस्ट करून उत्तर दिलं आहे. अमरिंदर सिंग यांनी फेसबुकवर काही फोटो पब्लिश केले आहेत. यामध्ये आरुसा देशातील वरिष्ठ नेत्यांसह चित्रपट कलाकारांसोबत दिसत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी वेगवेगळ्या लोकांचे आरुसा आलम यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आहे. मला वाटतं की त्या सर्वांचासुद्धा आयएसआयशी कनेक्शन आहे. जे असं बोलले होते त्यांनी बोलण्याआधी विचार करायला हवा. दुर्दैवाने आता भारत पाकिस्तान यांच्यात व्हिसा बंदी आहे. नाहीतर मी आरुसा यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं असतं. मार्चमध्ये मी ८० वर्षांचा होईन आणि आरुसी आलम ६९ वर्षांच्या होतील. आजकाल लोकं संकुचित विचारांचे झाले आहेत असंही अमरिंदर सिंग यांनी म्हटलं.

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की, राज्य सरकार आयएसआयशी आरुसा यांच्या संबंधांची चौकशी करेल. यानंतर सोमवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी फेसबुकवर आरुसा आलम यांचे १४ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सोनिया गांधी, सुषमा स्वराज, मुलायम सिंह यादव, अमर सिंग, अश्विनी कुमार, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, श्याम सरन, जगजित सिंग अरोरा यांच्यासोबतच्या फोटोंचा समावेश आहे.

याआधीसुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींचा फोटो शेअर केला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या माध्यम सल्लागारांनी आरुसा आलम यांच्यासोबत सोनिया गांधींचा फोटो पोस्ट केला होता. यात कॅप्शनमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग करण्यात आलं होतं. तसंच सहजच असं कॅप्शन होतं. उपमुख्यमंत्री सुखजिंदर यांनी कॅप्टन आणि आरुसा आलम यांच्या मैत्रीला आयएसआय कनेक्शन असल्याचा दावा केला होता. अमरिंदर पंजाबचे मुख्यमंत्री होते तेव्हा कधी राज्यात धोका दिसला नाही. आता त्यांना असं कसं वाटत आहे? यामागे त्यांची मैत्रिण आरुसा आलम तर नाही ना? असे प्रश्न रंधावा यांनी विचारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT