charanjit-singh-channi 
देश

पंजाब: असं आहे नवं 'चन्नी मंत्रिमंडळ'; रविवारी शपथविधी

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड : पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाची नावे निश्‍चित झाली आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पाच निकटवर्तीयांना नारळ दिला आहे. तर आठ मंत्र्यांची वापसी होत आहे. नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहरे आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्यपालाची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले.

पंजाबच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित झाली आहेत. दिल्लीत नावे अंतिम झाल्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी परत सिमल्याकडे रवाना झाले. ते बैठकीसाठी सिमल्याहून दिल्लीला आले होते. मुख्यमंत्री चरणजित चन्नी देखील पंजाबला परतले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल बी.एल. पुरोहित यांच्याशी चर्चा केली. यानुसार उद्या सायंकाळी ४.३० वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे चन्नी यांनी पत्रकारांना सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा आणि ओ.पी. सोनी यांनी शपथ घेतली आहे.

कॅप्टनच्या मंत्रिमंडळातील साधू सिंग धर्मसोत, बलवीर सिद्धू, राणा गुरमीत सोधी, गुरप्रीत कांगड, सुंदरश्‍याम अरोरा यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यात साधू सिंग धर्मसोत यांच्यावर पोस्टमॅट्रिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. राणा सोधी यांनी सिद्धू गटाने बंडखोरी केल्यानंतर कॅप्टनचे शक्तीप्रदर्शन घडवण्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. कांगड यांच्यावर जावयाला सरकारी नोकरी दिल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी सुनील जाखड यांनी दबाव आणला होता. परंतु उपयोग झशला नाही. सुंदर शाम अरोरा देखील कॅप्टनच्या जवळचे असून त्यांच्यावरही जमीनीशी संबंधित आरोप आहेत. पंजाब मंत्रिमंडळात मनप्रीत बादल, विजयेंद्र सिंगला, रझिया सुलताना, ब्रह्म मोहिंदरा, अरुणा चौधरी, भारतभूषण आशू, तृप्त राजिंदर बाजवा आणि सुख सरकारिया यांची वापसी होत आहे. तसेच राजकुमार वेरका, परगतसिंग, संगत गिलजिया, गुरकिरत कोटली, कुलजित नाग्रा, राणा गुरजित आणि अमरिंदरसिंग राजा वडिंग यांचा नव्याने समावेश होत आहे. गुरकिरत कोटली हे लुधियानाचे खासदार रवनीत बिट्टू यांचे चुलत बंधू असून माजी मुख्यमंत्री दिवंगत बिअंतसिंग यांच्या कुटुंबातील आहेत.

नावावर पहाटे दोनपर्यंत मंथन

पंजाब कॅबिनेटच्या विस्तारावरून कॉंग्रेस हायकमांड संभ्रमात आहे. तिनदा बैठक होऊनही मंत्र्यांची यादी फायनल होत नव्हती. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा सुरू होती.जुन्या मंत्र्यांना डावलले तर ते नेते कॅप्टनच्या गटात सामील होऊ शकतात, असा संशय चर्चेत व्यक्त करण्यात आला.कॉग्रंसेमध्ये फूट पडली तर कॅप्टनचा गट मजबूत होईल. निवडणुकीला आता तीन महिनेच राहिले आहेत. बंडखोरी झाली तर नुकसान सहन करावे लागेल, अशी शक्यता वर्तविली गेली. या बैठकीत प्रियांका गांधी, हरिश रावत, अजय माकन, के.सी.वेणुगोपाल सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT