Bhagwant Mann
Bhagwant Mann  esakal
देश

Bhagwant Mann : मला रात्रीच त्याचा ठावठिकाणा कळला होता; अमृतपालच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

सकाळ डिजिटल टीम

कट्टरपंथी प्रचारक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला आज (रविवार) सकाळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

चंदीगड : पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अमृतपाल सिंगला आज (रविवार) मोगामधील रोडे गावातून अटक केली. फुटीरतावादी नेता अमृतपालच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांची प्रतिक्रिया आता समोर आलीये.

मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, तो फरार होऊन 35 दिवस झाले होते. आज अमृतपालला अटक करण्यात आली. देशाची शांतता आणि कायदा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

भगवंत मान म्हणाले, 'आम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देणार नाही. तसंच आम्ही सूडाचं राजकारण करणार नाही. या 35 दिवसांत शांतता आणि बंधुभाव राखल्याबद्दल मी 3.5 कोटी पंजाबींचे आभार मानतो. यापूर्वी बंधुभाव आणि वातावरण बिघडवण्याचे खूप प्रयत्न झाले. पण, आम्ही हे होऊ दिलं नाही.'

मान पुढं म्हणाले, मला काल रात्री संपूर्ण माहिती मिळाली. मी रात्रभर झोपू शकलो नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नको म्हणून, मला दर 15-30 मिनिटांनी माहिती मिळत होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला पंजाबमधील तरुणांच्या हातात मोठ्या पदव्या पाहायच्या आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं पाहायची आहेत, असं मान म्हणाले.

अमृतपाल महिनाभरापासून होता फरार

विशेष म्हणजे, कट्टरपंथी प्रचारक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला आज (रविवार) सकाळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तो महिनाभराहून अधिक काळ फरार होता.

अमृतपालला ताब्यात घेतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तो पांढरे कपडे परिधान केलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये अमृतपाल आत्मसमर्पण करत असल्याचं सांगत आहे. तो व्हिडिओमध्ये बोलत आहे.

"हे संत भिंद्रनवाले यांचं जन्मस्थान आहे. याच ठिकाणी माझा 'दस्तार बंदी' (पगडी बांधण्याचा) सोहळा झाला होता. आम्ही आयुष्याच्या एका वळणावर उभे आहोत. एक महिन्यापूर्वी सरकारनं शिखांवर अत्याचार' केले. जर फक्त मला अटक करण्याचा प्रश्न असेल, तर कदाचित अटक करण्याच्या इतर अनेक पद्धती असतील ज्यांना मी सहकार्य करेन."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT