Bhagwant Mann
Bhagwant Mann SAKAL
देश

पंजाबच्या भल्यासाठी अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन : भगवंत मान

सकाळ डिजिटल टीम

जालंधर : पंजाबच्या भल्यासाठी जर अधिकाऱ्यांना इस्रायलला पाठवावे लागले, तर मी त्यांना पाठवीन, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM) यांनी म्हटले आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर ही बैठक म्हणजे, एक प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यावर विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर 'रिमोट कंट्रोल'ने चालत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या आरोपांवर मान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते जालंधरमध्ये बोलत होते. (Bhagwant Maan News)

मान म्हणाले की, प्रशिक्षणासाठी अधिकारी दुसऱ्या राज्यात जाण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हे तेच अधिकारी होते जे यापूर्वी तामिळनाडूमध्ये प्रशिक्षणासाठी गेले होते. आमचे अधिकारी दिल्लीला का गेले होते, हे तुम्हाला 16 एप्रिलला कळेल असेदेखील यावेळी मान यांनी सांगितले. आपल्याला बाजूला केले जात असल्याच्या कॅप्टन आणि विरोधकांच्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले की, राज्यात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते सर्व निर्णय मी स्वतः घेत आहे, त्यामुळे आपल्याला बाजूला केले जात असल्याच्या विधानांवर गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे मान यांनी सांगितले.

आज पंजाबमध्ये शेतकऱ्यांची पिके MSP पेक्षा जास्त किमतीत खरेदी केली जात आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले आणि कुठे आहे विरोधक? दोन-चार जागा जिंकणारे विरोधी पक्ष कधी झाले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. लवकरच जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ बांधले जाईल. त्याची तयारीही सुरू आहे. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीबाबत लंडनमधील तज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT