Punjab Congress leader Navjot Singh Sidhu will be released from Patiala jail on 1st April  
देश

Navjot Singh Sidhu : अखेर तुरुंगातून बाहेर येणार सिद्धू; 'या' प्रकरणात मिळाली होती एक वर्षाची शिक्षा

रोहित कणसे

नवी दिल्ली : रोड रेज प्रकरणी तुरुंगात असलेले पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची 1 एप्रिल रोजी पतियाला तुरुंगातून सुटका होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू यांची सुटका शनिवारी (१ मार्च) होणार आहे. त्यांच्या ऑफिशीयल ट्विटर हँडवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यानंतर सिद्धू यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. रोड रेज प्रकरणात सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांनी २० मे रोजी पटियाला कोर्टात आत्मसमर्पन केलं होतं.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आतापर्यंतच्या शिक्षेत सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतलेला नाही. अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये कैदी वगळता इतर सर्वांना त्यांची कारागृहातील वर्तनाच्या आधारे महिन्यातून चार ते पाच दिवसांची सवलत दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही लाभ कैद्याला मिळतो. अशा परिस्थितीत या सवलतीचा फायदा घेत सिद्धूची एक एप्रिलला तुरुंगातून सुटका होऊ शकते.

यापूर्वीच २६ जानेवारी २०२३ रोजी सिद्धू यांची सुटका होणार असल्याची चर्चा होती मात्र प्रजासत्ताक दिनापूर्वी कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव पंजाब मंत्रिमंडळात ठेवण्यात आला नव्हता. सिद्धूची सुटका न झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांना निराश व्हावे लागले. सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनीही ट्विट करून पंजाब सरकारवर हल्लाबोल केला होता.

सिद्धू यांनी तुरुंगात योग आणि ध्यान धारना यावर पूर्ण भर दिला आहे. शिक्षे दरम्यान सिद्धू यांनी आपले वजन ३४ किलोने कमी केले आहे. रोज पहाटे तीन वाजता उठल्यावर ध्यान धारणा करत. योगासोबतच ते तुरुंगाच्या आवारात भरपूर फिरायचे, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT