sidhu and amrindar singh sidhu and amrindar singh
देश

पंजाबमध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारणार काँग्रेस?

सकाळ डिजिटल टीम

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली. आता काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरु आहेत.

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहात गेल्या आठवड्याभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर अचानक पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली. आता काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरु आहेत. आता यात माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांचे नाव आघाडीवर आहे. पंजाबच्या पाटियाला मतदारसंघातून त्या लोकसभा खासदार आहेत. सिद्धूंची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते इच्छुक नसल्याचं समजत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे नेते नाराज आहेत. सिद्धूंचा राजीनामा जरी स्वीकारला नसला तरी तो सिद्धूंनी परत घेतला नाही तर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात पडू शकते. अद्याप तरी काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव निश्चित केले नसले तरी त्यासाठी हालचाली सुरु आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीला प्रदेशाध्यक्ष पद दिल्यास कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नाराजी कमी करण्याचा तो प्रयत्न ठरेल. तसंच सिद्धूंना यामुळे आपोआप बाजुला सारलं जाईल अशी चर्चा आता रंगली आहे.

सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेससमोर तीन ते चार नावांचा पर्याय आहे. प्रियांका गांधींचे सल्लागार विभाकर शास्त्री यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या तरी सिद्धू आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते यांच्यात कोणतीच चर्चा नसल्याचं म्हटलं जातंय.

दुसऱ्या बाजुला माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यानं नव्या तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. यामुळे असं म्हटलं जात आहे. की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजप राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्री करू शकते. तसंच अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषी मंत्रिपदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT