Officials seized ₹5 crore cash, 1.5 kg gold, luxury car keys, and property documents from DIG Harcharan Singh Bhullar’s locations during a high-profile raid in Punjab.

 

esakal

देश

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

Punjab DIG Harcharan Singh Bhullar Under Investigation: पंजाबच्या भ्रष्ट डीआयजीच्या ठिकाणाहून सापडलेलं भलंमोठं घबाड पाहून तपास अधिकारीही हबकले

Mayur Ratnaparkhe

CBI Raid on Punjab DIG Harcharan Singh Bhullar's Spots : पंजाबमध्ये पाच लाख रुपयांची लाच घेताना, सीबीआयने रंगेहाथ अटक केलेले भ्रष्ट डीआयजी हरचरण भुल्लर यांच्या ठिकाणांच्या घेण्यात आलेल्या झाडाझडतीत कुबेराचं घबाड सापडलं आहे. कोट्यवधींची रोकड, सोन्याचे दागिणे, महागड्या घड्याळी, अलिशान कार आणि बरच काही पाहून तपास अधिकारी हबकले होते.

सीबीआयने भुल्लर यांना पाच लाखांची लाच घेतना रंगेहाथ पकडल्यानंतर, त्यांच्या अन्य कार्यालयांसह घरी छापेमारी केली. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार पाच कोटी रुपयांची रोख रक्कम, दीड किलो सोने, महागड्या घड्याळी आणि मर्सिडिज, ऑडी सारख्या अलिशान कारच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.  

तर महत्वाची बाब म्हणजे डीआयजींच्या आवारातून जप्त करण्यात आलेली रोख रक्कमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. शिवाय, सोने-चांदींच्या दागिन्यांसह अनेक फ्लॅट्स व जमिनीची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहे.

सीबीआयने भुल्लर यांच्यासह आणखी एका व्यक्तीला या लाचखोरीत्या प्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील मेजर मेहल सिंग भुल्लर पंजाब पोलिस दलातच डीजीपी होते आणि त्यांचे धाकटे बंधू काँग्रेसचे माजी आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: चार मंत्री असूनही एमआयडीसी का नाही?: शशिकांत शिंदेंचा सवाल; साताऱ्यातील देगाव एमआयडीसीबाबत माेठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Pune News : शाळेच्या बसची भीषण धडक; पाच वर्षीय साईनाथचा मृत्यू; बसचालक आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 डिसेंबर 2025

IND vs SA: अरे माग रे इच्छा...! रोहित शर्माच्या पापणीचा केस गालावर पडताच रिषभ पंतने काय केलं पाहा Video

ढिंग टांग - बाबाजी वेंगा यांची भविष्यवाणी…!

SCROLL FOR NEXT