Shooting at an election rally Shooting at an election rally
देश

Punjab Elections : अकाली आमदारांच्या निवडणूक सभेत गोळीबार

आमदार निवडणुकीच्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर गावातील तरुण आणि काही बाहेरील लोकांमध्ये शाब्दिक युद्ध झाले

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमधील (Punjab Elections) जालंधरमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या आमदाराच्या निवडणूक सभेत (meeting) गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. गोळीबाराच्या वेळी आमदार घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांनी या प्रकरणाचा खुलासा करीत हे प्रकरण भांडणकर्त्यांमधील वैयक्तिक भांडणाशी संबंधित असून, निवडणुकीच्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. सोढी बाथ असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधरच्या नकोदरच्या चुहार गावात गुरुवारी झालेल्या गोळीबारात सोढी बाथ हा जखमी झाला. शिरोमणी अकाली दलाचे आमदार गुरप्रीत वडाळा यांनी आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीच्या ठिकाणी ही घटना घडली. गोळीबाराच्या वेळी आमदार घटनास्थळावरून निघून गेले होते.

आमदार निवडणुकीच्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर गावातील तरुण आणि काही बाहेरील लोकांमध्ये शाब्दिक युद्ध झाले आणि गोळीबार (Firing) करण्यापूर्वी त्यांनी लाकडी दांडक्याने एकमेकांवर हाणामारीही केल्याचे सांगितले जात आहे. बैठक अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडली असून या वादाला कोणताही राजकीय रंग नसल्याचे आमदार म्हणाले. ही त्यांची वैयक्तिक लढाई होती, असेही ते ठमपणे म्हणाले.

गावात निवडणूक बैठक (Punjab Elections) बोलावली (meeting) होती. घटना घडण्याच्या १५ मिनिट आधी निघून गेले होते. पीडित गावच्या माजी सरपंचाचा ड्रायव्हर आहे. तो देखील बैठकीला उपस्थित होता, असे आमदार गुरप्रीत वडाळा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT