Bhagwant Maan_Banawarlal Purohit 
देश

President Rule: पंजाबच्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्याना अंतिम इशारा! "उत्तर द्या, अन्यथा राष्ट्रपती राजवट...."

राज्यात संविधानिक व्यवस्था कोलमडली असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंदीगड : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. आपल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अन्यथा आपणं राष्ट्रपतींना पत्र लिहू असं राज्यपालांनी म्हटलं आहे. (Punjab Governor Banwarilal Purohit warns CM Bhagwant Mann could recommend President rule)

राज्यपाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री मान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "राज्यात संविधानिक व्यवस्था कोलमडली आहे, हे सांगायला मला दुःख होत आहे. आयपीसीच्या कलम 124 अंतर्गत मी तुम्हाला माझ्या पत्रांमधून मागितलेली आवश्यक माहिती पाठवण्यास सांगतो. तसेच राज्यातील ड्रग्जच्या समस्येबाबत तुम्ही उचललेल्या पावलांबाबत जर तुम्ही अयशस्वी झालात तर माझ्याकडं त्याशिवाय पर्याय राहणार नाही, कायदा आणि संविधानानुसार कारवाई करा"

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

भारतीय राज्यघटनेचा हवाला देऊन राज्यपाल म्हणाले, “प्रशासन चांगल्या, कार्यक्षम, निःपक्षपाती आणि प्रामाणिक म्हणून गणलं जाईल याकडं लक्ष देण्याच्या कर्तव्यानं मी बांधील आहे. सरकारनं नमूद केलेले प्रस्ताव देशाच्या कायद्याच्या विरोधात नाहीत, म्हणून मी तुम्हाला सल्ला आणि इशारा देऊ इच्छितो की वर उल्लेख केलेल्या माझ्या पत्रांना प्रतिसाद द्या आणि मी मागितलेली माहिती द्या” (Latest Marathi News)

माहिती देण्यास टाळाटाळ?

एक ऑगस्टच्या पत्रानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपाल पुरोहित म्हणाले, “मी मागितलेली माहिती तुम्ही अद्याप दिलेली नाही. ही माहिती देण्यास तुम्ही जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहात असं दिसतंय. मला हे सांगण्यास खेद वाटतो की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 167 मधील स्पष्ट तरतुदी असूनही मुख्यमंत्र्यांना राज्याच्या कारभाराशी संबंधित अशी सर्व माहिती राज्यपालांनी मागितल्यास ती देणं बंधनकारक आहे" (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रपती राजवटीसाठी लिहिणार पत्र

दरम्यान, जर माझ्या पत्राला तुम्ही उत्तर दिलं नाही तर मी राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचा विचार करतो आहे. पंजाबमध्ये कलम 356 अन्वये घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाल्याचा अहवाल पाठवण्याचा आणि त्याअंतर्गत फौजदारी कारवाई सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे, असंही आपण राष्ट्रपतींना पत्राद्वारे सांगणार आहोत, असं राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT